Tag Archives: recruitment

जयंत पाटील यांची मागणी,… फक्त त्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहीत केली मागणी

फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक नि टंकलेखक या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान उमेदवारांना …

Read More »

कृषी विभागातील ‘या’ पदासाठी १५ दिवसात जाहिरात, अब्दुल सत्तार यांची घोषणा २ हजार रिक्त पदे भरणार

कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करुन कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात येईल. या पदभरतीची जाहिरात येत्या १५ दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधानपरिषदेत सदस्य सतिष चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची नोकरभरती पाच महिन्यात पूर्ण करणार ६६७ पदे लवकरच भरणार- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

आदीवासीबहुल जिल्ह्यातून हि १७ पदे स्थानिक आदीवासींमधून भरण्याचा निर्णय आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहे, अशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे आदिवासी युवक – युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे. या बैठकीत राज्यपालांनी अनुसूचित क्षेत्रातील १७ …

Read More »

तरूणांसाठी खुषखबरः शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांसाठी भरती, जाहिरात प्रसिध्द महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध एकाच अर्जाद्वारे भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार- अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर

महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे आयोगाचे अध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, ४० हजार पदांची भरती प्रक्रिया आणि या सेवा सुरु करा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज …

Read More »

ग्रामविकास विभागातील पदे तत्काळ भरणार -ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची विधानसभेत माहिती

ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी …

Read More »

अनुसूचित जमाती प्रवर्गातील ३ हजारहून अधिक जागांसाठी ३१ जुलै पर्यंत भरती प्रक्रिया मंत्री दीपक केसरकर यांची विधान परिषदेत माहिती

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे. यामध्ये आदिवासी उमेदवारावर कोणताही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन त्यांना त्वरित न्याय मिळावा म्हणून रिक्तपदे भरतीसाठी कालबद्ध पद्धतीने भरतीप्रक्रिया तातडीने राबवणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली. …

Read More »

लवकरच ३ हजार ११० तलाठी भरती ५१८ मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठयाकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, ८० टक्के अपाजपत्रित तर सरळसेवेतील १०० टक्के पदे भरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्यातील ७५ हजार शासकीय पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत …

Read More »