Tag Archives: Shivsena(UBT)

उद्धव ठाकरे यांचा मोदी वर हल्लाबोल, गरम सिंदूरचं आता काय कोल्ड्रिक्सं झालं काय? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरे यांची टीका

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळावर हल्ले करून उद्धवस्त केले. तत्पूर्वी बिहारमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरे शरीर मे खून नही तो गरम सिंदूर बह रहा है असे वक्तव्य करत उपस्थित समुदायाला भावविवश केले. त्यास तीन चार महिनेच उलटून …

Read More »

शरद पवार यांचा गौप्यस्फोट, विधानसभेच्या आधी आम्हाला दोघे भेटले… उद्धव ठाकरे यांच्या बसण्याच्या जागेचा विषय टीकेचा होऊ शकतो का?

नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवळपास सहा महिन्यापासून कर्नाटक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीचा अभ्यास करून मतचोरीचा भांडाफोड केला. त्यानंतर काल इंडिया आघाडीची बैठकही पार पडली. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूीच्या आधी दोन व्यक्ती आपणास आणि राहुल गांधी यांना आणि मला भेटले. …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा इशारा, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला. उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. …

Read More »

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल; पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. आमदार अनिल परब यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, हिंदी भाषेसंदर्भातील पूर्वीचे दोन्ही जीआर निर्णय रद्द आता त्रिसुत्री भाषेसाठी डॉ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती, समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेणार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारी चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तरीही राज्य सरकारच्यावतीने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेच्या अनुषंगाने राज्य सरकारने जारी केलेले शासन निर्णय रद्द करण्यात …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा टोला, पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार ! अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, मंत्र्याचा मुलगा सिद्धांत शिरसाटकडे ६७ कोटी आले कोठून? महागडी मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, अमित शाह यांनी लुटीला परवानगी दिली का

राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या कौटुंबिक वादळाला आता पूर्णविराम मिळाला. पण आता शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दुसर्‍या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट करत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या कमाईचे साधन काय असा सवाल करत, महागडी मालमत्ता खरेदीसाठी त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून, …

Read More »

शिवसेना उबाठाच्या अनेक जणांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गटाच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय

पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही, महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजपा संपवत आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी मविआ व इंडिया आघाडी काम करत आहे. भाजपाविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले …

Read More »