Tag Archives: union home minister

महाराष्ट्रातील या ७६ पोलिसांना स्वातंत्र्यदिनानिमित्त पदके जाहीर ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, तर ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’

पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आले. यासह राज्यातील ३३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’, …

Read More »

अमित शाह यांनी मांडलं नवं राजद्रोह क्रिमिनल सुधारणा विधेयक मॉब लिचिंग प्रकरणी मिळणार मृत्यूदंड

ब्रिटीश राजसत्तेने त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कारवायांना आळा घालण्यासाठी राजद्रोह कायद्याची तरतूद केली होती. या कायद्याचा वापर करत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही केंद्र सरकारकडून गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप काहीजणांनी केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी सुनावणी घेताना ब्रिटीशांच्या काळातील राजद्रोह कायदा अद्याप कशासाठी ठेवला आहे अशी विचारणा केंद्र सरकारला करत हा …

Read More »

अजित पवार म्हणाले, प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने अमित शाहकडे सादर करा राज्यातील विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करा

“पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण …

Read More »

न्यायालय आणि इंडियाच्या विरोधानंतरही मोदी सरकारने दिल्लीचे विधेयक केले मंजूर काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग

दिल्लीचे प्रशासनिक बदल्यांचे अधिकार कोणाकडे असावे यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या बाजूने निकाल दिला. मात्र काहीही करून दिल्लीचे प्रशासनिक अधिकार मोदी सरकारकडचे रहावे या उद्देशाने मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा अध्यादेश जारी करत सदरचे अधिकार मोदी सरकारकडेच घेतले. या विधेयकावरून आम आदमी पक्षाने देशभरातील सर्व विरोधी …

Read More »

शरद पवार धमकी प्रकरणी सुप्रिया सुळे यांचा इशारा,…. तर देशाचे आणि राज्याचे गृहमंत्री जबाबदार शरद पवारांना सोशल मिडियावर धमकी ; खासदार सुप्रिया सुळे आणि शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शरद पवार यांना ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी सोशल मिडियावर विशेषतः फेसबुकवर देण्यात आली आहे. ही गंभीर …

Read More »

सत्यपाल मलिक यांच्या आरोपावर अमित शाहंनी सोडले मौन म्हणाले, पदावर असताना….. सत्तेत असताना विवेक जागा होत नाही

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती आणि पुलवामा हल्ल्याबाबत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असताना याप्रश्नावर भाजपाचे अनेक बड्या नेत्यांनी गप्प राहणे पसंत केले. मात्र मलिकांच्या आरोपांना …

Read More »

कोश्यारींच्या इच्छेनंतर दिल्लीत अमित शाहंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पंकजा मुंडेही पोहोचल्या अमित शाहच्या कार्यालयात

एरवी एकाही वादग्रस्त घटनांबद्दल किंवा वक्तव्यावरून राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अनुषंगाने एकही प्रसिध्दी पत्रक जारी केले जात नाही. मात्र काल पहिल्यांदाज राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आपण नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे पत्रक राजभवनाकडून जारी करत शिंदे-फडणवीस सरकार स्थानपन्न झाल्यानंतरही पडद्यामागे सगळंच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. …

Read More »

अखेर मार्गदर्शनासाठी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, अमित शाहजी मला मार्गदर्शन करा माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, मार्गदर्शन करा

मराठवाडा विद्यापाठीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकिय योगदानाबद्दल डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ही पदवी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणा दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज …

Read More »

बोम्मईंची तक्रार देवेंद्र फडणवीसांनी केली अमित शांहकडे, म्हणाले, विनाकारण… फोनवरून झालेल्या चर्चेनंतरही तोडगा न निघाल्याने फडणवीसांनी केली तक्रार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला आहे. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. …

Read More »

पीएफआय संघटनेवरील बंदीचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत केंद्रिय गृहमंत्र्यांचे मानले आभार

देशाची अखंडता, सार्वभौमत्व आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवर बंदी घालण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. पीएफआय व तिच्या सहयोगी संघटना गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे …

Read More »