Tag Archives: workers

आदिती तटकरे यांचे निर्देश, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करा प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी आदी निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्याच्या …

Read More »

मायक्रोसॉफ्टच्या ऐच्छिक राजीनाम्याच्या प्रस्तावामुळे आयटी कर्मचारी द्विधा मनःस्थिती ५० वर्षाच्या आणि २३ वर्षाच्या कर्मचाऱ्याची सारखीच मानसिकता

वॉशिंग्टन राज्यात राहणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने वयाच्या ५० व्या वर्षी, जवळपास तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीतील पुढील पाच वर्षांची योजना आखली होती. भारतातून भरती झालेले हे कर्मचारी सप्टेंबर २००० मध्ये तिथे स्थायिक झाले आणि अखेरीस कोपायलट व आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणारे लेव्हल ६९ (पार्टनर-लेव्हल कर्मचारी) बनले. वयाच्या ५५ ​​वर्षांपर्यंत काम …

Read More »

नेपाळच्या पुरामुळे बोगद्यात अडकलेल्या कामगार आणि इंजिनिअरची सुटका बचावलेल्या कामगार आणि इंजिनिअरची पुनर्जन्म झाल्याची भावना

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी अचानक पुरामुळे (flash floods) एका जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अनेक कामगार अडकले होते. बचावलेल्यांना शोधण्याच्या आशा मावळू लागल्या असतानाच, शुक्रवारी दोन कामगारांची चमत्कारिकरीत्या सुटका करण्यात आली. मेकॅनिकल इंजिनिअर संजय साह यांच्यासाठी हे एखाद्या पुनर्जन्मासारखेच होते; मृत्यू आणि जीवन यांच्यातील त्या अनिश्चित काळात आपण सतत ‘हरे कृष्ण महामंत्रा’चा जप …

Read More »

आकाश फुंडकर यांचे निर्देश, आयटी कंपन्यांमधील कामगार हितासाठी अभ्यास गट गठीत करा बैठकी दरम्यान दिले आदेश

राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित आहे. त्यासाठी अभ्यास गटाची स्सथान करावी, असे निर्देश ॲड आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयात पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले …

Read More »

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय–निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ६ च्या तरतुदीनुसार नियम

विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांनी विविध प्रलंबित …

Read More »

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा इशारा

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात …

Read More »

आंध्र प्रदेशप्रमाणे आता महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना १२ तास काम करणे बंधनकारक कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता– कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती

काही महिन्यापूर्वी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलगू देसमचे प्रमुख तथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंदाबाबू नायडू यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवून ९ तासाऐवजी १२ तास काम करण्याचे बंधन घालणारा कायदा पारित केला. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील कामगारांनाही १२ तास कामाचे बंधन घालणाऱ्या नव्या कायद्यातील तरतूदीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी …

Read More »

ईपीएफओ मधून पैसे काढणार असाल तर या पाच नव्या अटी पूर्ण करा ५ महत्वाच्या अटी पूर्ण केल्यानंतर पैसे काढा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात ईपीएफओ EPFO २०२५ मध्ये पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. देशातील ७ कोटींहून अधिक लोकांचे पैसे ईपीएफओ EPFO ​​मध्ये जमा आहेत आणि हे नवीन नियम त्या सर्वांसाठी खूप महत्वाचे आहेत. आता पीएफ काढणे पूर्वीपेक्षा सोपे, जलद आणि डिजिटल झाले आहे. जर तुम्ही देखील …

Read More »

पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना यूकेमध्ये शिक्षण काम करण्यास बंदी पाकिस्तानसह या तीन देशांना व्हिसा न देण्याचा निर्णय

पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना आणि कामगारांना यूकेमध्ये शिक्षण घेण्यास आणि काम करण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे, नायजेरियन आणि पाकिस्तानी नागरिकांसह, जे जास्त काळ राहण्याची आणि आश्रय घेण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्या रोजगार आणि अभ्यास व्हिसासाठी अर्ज गृह कार्यालयाद्वारे प्रतिबंधित केले जातील, असे द टाईम्सने वृत्त दिले आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान (१०,५४२), …

Read More »

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी ५० टक्के सहाय्यक अनुदान शासनाकडून तर उर्वरित ५० टक्के खर्च ग्रामपंचायतीने करावयाचा आहे. त्या अनुषंगाने कमी उत्पन्न व कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे सुलभ व्हावे म्हणून ग्रामपंचायतींना लोकसंख्या  व उत्पन्नानुसार वाढीव साहाय्यक अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सन २०२२ पासून सुधारित किमान वेतन …

Read More »