चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन, महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविणार महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

उच्च शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे आणि देशाच्या विकासात योगदान देणारा सुजाण नागरिक बनवणे हा आहे. त्यासाठी महाराष्ट्राला शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांचे जागतिक केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि एलेट्स टेक्नोमीडिया यांच्या सहकार्याने डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे ‘महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषदेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, (दूरदृष्य प्रणालीद्वारे) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी,सीईटी आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक प्रमोद नाईक,एलेट्स टेक्नोमीडियाचे संस्थापक डॉ. रवी गुप्ता, राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, उद्योग जगताचे प्रतिनिधी आणि उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पाशी हे व्हिजन जोडलेले आहे. विद्यापीठांच्या वर्गखोल्यांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता विकसित करत आहोत, तेच विद्यार्थी उद्याच्या समृद्ध, सशक्त आणि आत्मनिर्भर भारताची पायाभरणी करणार आहेत.

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण बनविणे आणि विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जगभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात यावेत, संशोधकांनी नव्या संशोधनासाठी एकत्र यावे, असे जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र उच्च शिक्षण शिखर परिषद २०२६ हे त्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरेल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

रवी गुप्ता म्हणाले, या परिषदेत महाराष्ट्राला जागतिक शिक्षण केंद्र बनविण्याबरोबरच राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांची गुणवत्ता, संशोधन, उद्योगाभिमुख शिक्षण, रोजगारनिर्मिती, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य या विषयांवर धोरणात्मक चर्चा होणार असल्याचे नमूद केले..

अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी म्हणाले, बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजांनुसार उद्योग व बाजारपेठेला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडविणे, संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारासाठी सक्षम बनविणे, ही उच्च शिक्षण विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विकसित महाराष्ट्र २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी, उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, नामांकित शैक्षणिक संस्था आणि शिक्षणतज्ज्ञ यांना एका व्यासपीठावर आणून सर्वोत्तम कार्यपद्धती व विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने या उच्च शिक्षण शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.सर्वांच्या सहकार्यमुळे ही परिषद यशस्वी व फलदायी ठरेल, असा विश्वास आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठवाड्यातील दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे मराठवाड्यातील उद्योजकांकडून दुष्काळग्रस्तांसाठी ६ कोटी १८ लाखांचा मदतनिधी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *