कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली.
सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातून, आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या सिव्हील हॉस्पीटलमधून सुरु होणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील रूग्णालयातून सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

रुग्णालयांच्या उपचारांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आवाहन वैद्यकीय व आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजचे शुल्क पारदर्शक ठेवण्याचे आवाहन

रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा व सुविधांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *