सोलापूरात आज २९ रूग्ण सापडले ११ वा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी
शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होतच आहे. कालपर्यंत ७ आणि ८, ३ अशा स्वरूपात कोरोनाग्रस्त रूग्ण सापडत होते. मात्र आझ एकदम २९ रूग्ण आढळून आल्याने परिस्थिती गंभीर बनत असल्याचे दिसून येत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १८२ वर पोहोचली आहे.
या रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण आकाशवाणी केंद्र परिसरातील असून या भागात १२, अलकुंटे चौकात २, बापूजी नगर ४, भारतरत्न इंदिरा नगर २, नई जिंदगी ४, शनिवार पेठ १, रंगभवन १, रेल्वे लाईन १, न्यु पाच्छा पेठ २ आदी रूग्णांचे निदान झाले आहे. काल एका ४८ वर्षिय महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा आज मृत्यू झाला आहे. त्यानंतर सदर महिलेचा शवविच्छेदन अहवाल आला असता त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांची मागणी, डीपीटी लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव रद्द तात्काळ रद्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *