अत्यावश्यक सेवेतील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अशी आहे नियमावली अधिकृत क्यु आर कोडचे तिकिट असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेशातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर राज्य सरकारने मोठ्या प्रयत्नाने रेल्वे सेवा सुरु केली. मात्र या रेल्वे प्रवासासाठी सर्वाधिक अधिक सदर कर्मचारी अधिकाऱ्याकडे त्याचे महापालिका, मंत्रालय, खाजगी-शासकिय रूग्णालयात काम करत असलेच्या प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर व्यक्तीकडे क्यु आर कोड असलेले रेल्वेचे तिकिट जे संबधित अत्यावश्यक सेवेतील त्यांच्या विभाग प्रमुखांकडून जारी केलेले असेल त्यांनाच लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. जर एखाद्याकडे असे तिकिट नसेल तर त्याला परत पाठविण्यता येणार आहे.
याशिवाय प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिस दलाचा बंदोबस्त राहणार असून त्यांच्या सूचनेनुसारच सर्वांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांची लाईन लावणे, त्यांच्या ओळखपत्र, तिकिटाची तपासणी करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांशिवाय कोणालाही प्रवाशी तिकिट रेल्वेकडून विकले जाणार नसल्याचे पोलिसांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकची नियमावली सविस्तरपणे खालीलप्रमाणे..

About Editor

Check Also

कल्याणमध्ये मेगा ब्लॉकच्या दिवशी अज्ञात व्यक्तीची करामतः रेल्वे खांबावर चढल्याने करंट प्रकृती गंभीर, ऐन उन्हाच्या तडाख्यात अज्ञात इसमाचे कृत्य

कल्याण रेल्वे स्थानकात एका अज्ञात व्यक्तीने दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत खांबावर चढून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *