पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

कोरोनाची लागण विधिमंडळाच्या सदस्यांमध्ये पसरू नये यासाठी विधान परिषद आणि विधानसभेचे कामकाज आलटून पालटून करण्याचा प्रस्ताव सुरुवातीला पुढे आला. त्यानंतर दोन्हीपैकी एका सभागृहाचे कामकाज ऑनलाईन पध्दतीने चालविण्याचाही प्रस्तावही पुढे आला. मात्र हे दोन्ही प्रस्ताव अडचणीचे ठरत असल्याने हे दोन्ही प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी नाकारले.

विधिमंडळाने तयार केलेल्या तात्पुरत्या कामकाज पत्रिकेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाच दिवशी चालविण्यात येणार असल्याचे सध्या तरी दाखविण्यात आले आहे. तसेच कोणत्या दिवशी कोणते कामकाज चालणार हे ही दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे हीच तात्पुरती कामकाज पत्रिका कायम होणार का? कि त्यात होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे आदेश, टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *