संजय राऊत म्हणाले, कोठडीत भाजपाचे साडेतीन नेते जाणार, उद्या महाराष्ट्र बोलणार शिवसेना भवनातील पत्रकार परिषद सर्वांनी ऐकावी

मराठी ई-बातम्या टीम

मागील काही जण सांगतायत ना हा जाणार तो जाणार कोठडीत, अनिल देशमुख यांच्या शेजारी असलेल्या कोठडीत सॅनिटाईज करण्याची व्यवस्था करा सारखी वक्तव्ये काही जण करत आहेत. मात्र राज्यातही सरकार आहे हे दाखवून दिले जाणार असून भाजपाचे “ते साडे तीन नेते” कोठडीत जाणार असल्याचा इशारा भाजपाला देत उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार असून तेथे शिवसेना नाही तर मराठी माणूस बोलणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

आज दुपारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपाला इशारा दिला.  शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि स्वत: संजय राऊत हे ही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधकांना व केंद्रीय तपास यंत्रणांना सूचक इशारा दिला आहे. तसेच, उद्याची पत्रकार परिषद ही मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच होत आहे. उद्या शिवसेना पक्ष बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सुपर स्प्रेडर ठरवले असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

त्यांचं(विरोधकांचं) लक्ष उद्या असायलाच पाहिजे आणि त्यांनी माझी उद्याची पत्रकार परिषद काळजीपूर्वक ऐकायलाच हवी. त्यांनी ऐकायला हवी, केंद्रीय तपास यंत्रणांचे जे प्रमुख आहेत, त्यांनी तर माझी पत्रकार परिषद आवर्जून ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष बोलणार नसून उद्या महाराष्ट्र बोलणार आहे. उद्या मराठी माणूस बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मला वाटते उद्या कळेल महाराष्ट्र काय आहे. हे तुमचे जे धंदे सुरू आहेत ते कदाचित उद्यानंतर बंद होऊ शकतात. मला खासकरून शिवसेनेला म्हणजेच महाराष्ट्राला जे काय म्हणायचे, आता हे उपटसुंभे म्हणतील शिवसेना म्हणजे महाराष्ट्र का? मी म्हणेल होय, शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र. शिवसेना हाच ११ कोटी मराठी माणसांचा आवाज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणी उठतो केंद्रातून आणि महाराष्ट्राची बदनामी करतो असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावत इकडले भाजपावाले गांडुळासारखे बसून असतात. नाही, महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत हा वंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे दाखवू देवू असा इशारा देत आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सेना भवनाखाली आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढण्याची जी मर्दानगी शिकवली आहे ती उद्या दिसेल उद्या काय आहे ते. आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही आहोत. कुणी महाराष्ट्रवर उठावं बाहेरची लोक यावेत आणि मराठी माणसांना इकडे दमदाट्या कराव्यात, असं नाही होणार, आम्ही लढू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’,संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा हा ही कायदा न्यायालयात अडकून पडणार

‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, २०२६’वर कडक शब्दात टीका करत हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *