केवळ पुरवठा रखडू नये म्हणून खाजगी कंत्राटदाराकडून औषधांची खरेदी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचा माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शासकीय रूग्णालये आणि आरोग्य केंद्रासह इतर विभागांना औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्य विभागाकडून अजूनही खाजगी औषध विक्रीकरणाऱ्या कंत्राटदारांकडूनच खरेदी करण्यात येत आहे. मात्र हाफकीन मार्फत औषधांची खरेदी हळूहळू सुरु करण्यात येत असल्याने त्यास वेळ लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान राज्यातील रूग्णालयांसाठी लागणारी औषधांची खरेदी हाफकिन मार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तरीही हाफकीन मार्फत औषधांची खरेदी न करता ती अद्यापही खाजगी पुरवठादारांकडूनच खरेदी करण्यात येत असल्याबाबतचा मुद्दा काँग्रेसचे नसीम खान यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री.डॉ.सावंत यांनी वरील उत्तर दिले.

हाफकिन बायो-फार्मास्युटीकल्स कॉर्पोरेशनद्वारे होणारी खरेदी प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या कॉर्पोरेशनमार्फत प्रचलित कार्यपद्धतीनुसार खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊन औषधांचा पुरवठा होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. मात्र हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत रुग्णसेवेत अडथळा येऊ नये यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाद्वारे केलेल्या दरकरारांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *