राहुल गांधी यांची प्रतिक्रिया, सर्व मोदी मिडीया एक्झिट पोल, सिध्दु मुसेवालाचे गाणं ऐकलेय का? सातव्या टप्प्यातील मतदानानंतर जाहिर झालेल्या एक्झिट पोलवर दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात काल १ जून रोजी मतदान पार पडले, त्यानंतर विविध प्रसारमाध्यामांनी त्यांच्या सोबत असलेल्या काही कंपन्यांच्या माध्यमातून निवडणूक सर्व्हेक्षण जाहिर करण्यात आली. आतापर्यंत जारी झालेल्या निवडणूकोत्तर सर्व्हेक्षणात अर्थात एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीएच्या बाजूने कल दाखविण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुख्यालयात काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दात एक्झिट पोलवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

राहुल गांधी हे पक्षाच्या मुख्यालयात जाताना काही क्षण ते वाट पहात असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी थांबले. त्यावेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने देशातील लोकसभा निवडणूकीवर एक्झिट पोल जाहिर केल्याचे सांगत एनडीएला सर्वाधिक जागा मिळत आहेत, असा अंदाज वर्तविला. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की, जे जाहिर झाले त्याचे नाव मिडीटा एक्झिट पोल नाही. तर हे सर्व एक्झिट पोल हे मोदी मिडीयाचे एक्झिट पोल आहेत. ते सर्व मोदी यांना चांगले वाटावेत म्हणून जाहिर झालेले पोल आहेत असे सांगून पुढे निघाले.

त्यावेळी दुसऱ्या एकाने पुन्हा विचारले की, तुम्हाला किती जागा मिळतील असे वाटतेय असे विचारताच काही सेंकद चालता चालता थांबून पुन्हा परत येत राहुल गांधी म्हणाले की, तुमने सिध्दु मुसेवाला का गाना सुना है क्या, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर उपस्थित प्रतिनिधीने २९५ हा नंबर सांगितला. त्यावर राहुल गांधी पुन्हा म्हणाले की, २९५ जागा मिळणार असे सांगून आपल्या पुढी कामासाठी निघुन गेले.

https://x.com/INCIndia/status/1797169736414863753

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, नाशिक शहरातील मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *