जयंत पाटील यांची टीका, ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप, सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते ब्राम्हण संघटनांचा विरोध आणि सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरूनहूनही केली टीका

मागील काही दिवसांपासून या ना त्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. फुले चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर बोर्ड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. फुले चित्रपटावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर फुले चित्रपटातील काही दृश्यांबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आपल्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेत म्हणाले की, काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’ सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे असे ते म्हणाले.

Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता फुले चित्रपटावर आक्षेप घेतले जात आहे त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते अशी टीकाही त्यांनी सेन्सॉर बोर्डावर केली आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *