विजय वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ असतो का? असा सवाल विधानसभेतील  काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आज केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधाने करणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही यावेळी म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांचे म्हणणे आपण सगळ्यांनी ऐकले आहे. ज्यांच्या समोर पर्यटकांना मारले त्या नातेवाइकांनी तिथली हकिकत सांगितली आहे, तिथे वड्डेटीवार नव्हते. इथे बसून अशी विधाने करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे वाईट आहे. त्यांचे विधान असंवेदशील आणि मूर्खपणाचे असल्याची टीका करत असे विधान करून ते एकप्रकारे आपल्या शत्रूंना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत असा आरोपही यावेळी केला.

 

विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले….

पहलगाम येथे झालेला हल्ला हा देशावरील हल्ला आहे. तेथे पोलिस का नव्हती, सुरक्षा यंत्रणा का नव्हती यासह अनेक प्रश्न या निर्माण होत आहे. नागपूरातही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून राज्य सरकारचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही यावेळी केला.

तसेच यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी जारी केलेल्या दुसऱ्या व्हिडिओत म्हणाले की, भारताच्या एकात्मतेवर घाला घालण्याचा कट!! पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू म्हणजे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग पाडणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे हा आहे. दहशतवादी आणि त्यांच्या पाठराखण करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे भारताच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा देशविघातक प्रवृत्तींना मोडून काढणे अत्यावश्यक आहे. भारत एक आहे आणि एक राहील!

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *