मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काही जणांनी हल्ला केला. तसेच त्यांच्या तोंडाला आणि अंगावर शाई टाकण्यात आली. त्या विषयीचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनेच्या ठिकाणाहून पोलिसांनी एका जागेवरच अटक केली. सध्या सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, प्रविण गायकवाड यांच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. प्रविण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो संभाजी नावापुढे शिवाजी महाराजांचे नाव का नाही यावरून हल्ला करण्यात आला. तसेच संघटनेच्या नावातही संभाजी हे नाव एकेरी असल्यावरून हा हल्ला झाल्याचे सांगत घटनास्थळी पोलिस तातडीने पोहोचले आणि एकाला घटनास्थळीच व इतरांना नंतर अटक करण्यात आल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सर्व हल्लेखोरांना अटक केली आहे. ते अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहेत. त्यांना सोडून देण्यात आलं नाही. परंतु या घटनेनंतर पोलिसांनी प्रविण गायकवाड यांना तक्रार देण्याबाबत विचारले होते. परंतु त्यांनी तक्रार दिली नसल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून रूग्णालयाची उभारणी

पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *