वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट इशारा… मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, कोकाटे यांच्यासोबत समोरासमोर चर्चा करणार मग निर्णय घेणार

कृषी खात्यात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याच्या जागेवर नवे नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना कृषी पदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र माणिकराव कोकाटे यांनी मंत्री पद स्विकारल्यापासून काही ना काही वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनत आहेत. त्यातच आता विधिमंडळाच्या सभागृहात बसून रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरून तर विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील सहकाऱ्यांकडून टीकेस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मंत्रालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट शब्दात इशारा दिला.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. माणिकराव कोकाटे यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही. खरे तर दिल्लीत आज एक महत्वाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थितीही महत्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. माणिकराव कोकाटे यांनी त्या व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून ते रमी खेळत नव्हते. माझी आणि कोकाटे आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल, असे सांगितले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की, नेहमी भान ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे अशा सक्त सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी देखील सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्याकडून अशीच गोष्ट घडली होती. त्यावेळी त्याची दखल घेत मी त्यांना सांगितलं होतं, असं होता कामा नये, मात्र पुन्हा एकदा त्यांच्याकडून अशाच प्रकारची गोष्ट घडली आहे. त्यानंतरही त्यांना आम्ही जाणीव करून देत असं तिसऱ्यांदा व्हायची वेळ आणू नका म्हणून सांगितले. मात्र आता रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरणी ते म्हणतात मी रमी खेळत नव्हतो. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्याकडून चौकशी करण्याते येत असल्याचे मला समजले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सत्य काय असेल ते बाहेर येईल, आता सोमवारी किंवा मंगळवारी मंत्री कोकाटे यांना बोलावून समोरा समोर चर्चा करणार आहे. त्यानंतर मी निर्णय घेणार असल्याचे सांगत माणिकराव कोकाटे यांच्या मंत्री पदाबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार असल्याचा स्पष्ट इशाराच दिला.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *