मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास मुदतवाढ आझाद मैदान पोलिसांकडून एक दिवसाची मुदत

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आंदोलनास सुरुवात केली. मात्र दुपारपर्यंत राज्य सरकारकडून चर्चेच्या निमंत्रणाशिवाय काहीच हालचाल होताना दिसत नसल्याने अखेर दुपार नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज आझाद मैदान पोलिसांकडे सादर केला. त्यावर आज दिवसभराची मुदत संपल्यानंतर संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास आणखी एका दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत मराठा आरक्षणाचे आंदोलन मुंबई बाहेर ठेवावे असा निकाल देत त्यासाठी कोठे जागा द्यावी याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे निर्देश दिले. त्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांनी निर्णय घेत मराठा आरक्षणाविषयीच्या आंदोलनास एक दिवसाची मुदत दिली. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर दिवस अखेर राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चेला सुरवात झाली. परंतु चर्चेची पहिलीच फेरी पार पडली. तसेच या बैठकीत निर्णय झाला नाही. त्यामुळे आझाद मैदानावरील आंदोलनास आणखी काही दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी आझाद मैदान पोलिस स्टेशनला करण्यात आली.

अखेर याप्रश्नी राज्य सरकारने चर्चा आणि आढावा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अर्जाचा विचार करत मुदत वाढ देण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनास आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेत तशी माहिती जरांगे पाटील यांना दिली. आता मराठा समाजाचे आंदोलन आणखी एक दिवसांनी वाढले आहे.

About Editor

Check Also

मुंबईत साध्या वेषातील पोलिसाकडून आंदोलक महिलेशी गैरवर्तनः पोलिसांकडून मात्र सारवासारव पुरुष आंदोलकाला रोखण्याच्या नादात म्हणे महिला मध्ये आली

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेला एक साध्या वेषातील पोलीसाने आंदोलनादरम्यान एका महिलेला अत्यंत चुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *