काँग्रेस आमदार कोळंबकर यांचा राजीनामा मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंग वाढलेले असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील विद्यमान आमदारांनी भाजप प्रवेशासाठी आपापल्या पक्षाचे राजीनामे देण्याचा सिलसिला सुरु केला आहे. या यादीत आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश झाला असून त्यांनी सोमवारी मध्यानानंतर राजीनामा दिला.
राजीनामा देत असल्याचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कोळंबकर यांनी पाठविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करण्याऐवजी शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर करत शेवाळे यांचा प्रचार केला होता.
मागील महिन्यांपासून कालीदास कोळंबकर हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश जाणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार असून उद्या मंगळवारी त्यांचा भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *