पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर आरोप, काहीजण घुसखोरांचे संरक्षण करतायत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “काही लोक घुसखोरांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.” पंतप्रधानांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना ही टिप्पणी केली.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “अकार्यक्षम शासना”खाली राहणाऱ्या लोकांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागत आहे, तर सत्तेवर असलेले लोक केवळ राजकीय फायद्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांनी आरोप केला की, घुसखोरीमुळे विशेषतः आदिवासी समुदायांची उपजीविका, जमिनीचे हक्क आणि सुरक्षितता धोक्यात येत आहे आणि तरुण नागरिकांना संधींपासून वंचित ठेवले जात आहे, असा इशाराहीदिला.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जे लोक घुसखोरांसाठी आपल्या सत्तेचा वापर करत आहेत, ते घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे हक्क हिरावून घेत आहेत, त्यांची उपजीविका हिसकावून घेत आहेत, आदिवासींची जमीन बळकावत आहेत, आपल्या मुला-मुलींच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, आणि त्यांच्यासाठी महिलांवरील अत्याचार बिनबोभाट सुरू आहेत,” असे सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “टीएमसी नेत्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, पण त्यांनी आपल्या स्वतःच्या उणिवांकडेही पाहिले पाहिजे. तेथील (पश्चिम बंगालमधील) जनता या सरकारमुळे त्रस्त आहे. ते न्यायालयांमध्ये जाऊन घुसखोरांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फक्त सत्तेची पर्वा आहे असल्याचा आरोपही यावेळी केला.

मोदी यांनी आरोप करताना म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेला असलेल्या कथित धोक्यांवरही चिंता व्यक्त केली आणि विरोधकांवर गंभीर सामाजिक आणि सुरक्षा आव्हानांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.

मोदींनी काही राज्य सरकारांवरही टीका केली, आणि आरोप केला की त्यांच्या धोरणांमुळे सामाजिक फूट वाढली आहे आणि घराघरात शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, अशी सरकारे इतरांना उपदेश देत असताना महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरली आहेत.

पंतप्रधानांचे हे भाषण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भारताच्या सरन्यायाधीशांसमोर स्वतः युक्तिवाद करण्याची अभूतपूर्व कृती केल्यानंतर एक दिवसाने आले आहे, ज्यामुळे एसआयटीचा लढा रस्त्यांवरून आणि राजकीय मैदानातून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

दरम्यान, चीनने भारतीय भूमीवर केलेल्या आक्रमणाच्या आरोपावर उत्तर द्यावे अशी मागणी राज्यसभेत करत मोदींच्या हुकुमशाही विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मोदी यांनी आपले भाषण तसेच पुढे सुरु ठेवल्याने अखेर विऱोधकांनी राज्यसभेत सभात्याग केला.

About Editor

Check Also

जम्मू आणि काश्मीर प्रश्नी माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर खूनी हल्ल्याचा प्रयत्न पाठीमागून येऊन फारूख अब्दुल्ला यांना मारण्याचा प्रयत्न

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, वय वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *