उद्धव ठाकरे यांचा टोला, कर्ज काढून फटाके वाजविणारा अर्थसंकल्प कामगारांसाठी फसवा, विकासाचं मृगजळ दाखवणारा हा अर्थसंकल्प

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन पर ५० हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. यासोबतच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसंदर्भात इतरही काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पावर ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले की, कामगारांसाठी फसवा, विकासाचं मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला थोड्या दिवसात कळेल की या अर्थसंकल्पामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? असा सवालही यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आम्ही केली होती. दुर्दैवानं त्यानंतर कोरोना आला, जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून आम्ही ५० हजार रुपये देण्यास सुरुवात केली होती, आणि त्यानंतर आमचं सरकार पाडलं गेलं. एकूण जर अर्थसंकल्प पाहिला तर सातबारा कोरा झालेला नाही. लाडक्या बहिणीना २१०० रुपये देणार होते, त्याचा कुठे उल्लेख नाही. ठेकेदारांसाठी मात्र ठोस योजना आहेत, अगदी डिटेलमध्ये मार्ग कुठून कुठपर्यंत होणार आहे? त्यासाठी किती कोटी खर्च हे अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये ठेकेदारांसाठी ठोस अशा योजना आहेत, मात्र शेतकरी आणि कामगारांसाठी  फसवा आणि विकासाचं मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला थोड्या दिवसात कळेल की या अर्थसंकल्पामुळे त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे सर्व जण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मला नाही वाटत की त्यामधून राज्याचं काही हित साधलं जाईल. तुम्हाला जर शेतकऱ्यांचं खरच काही भलं करायचं असेल तर पात्र अपात्र हा जो काही त्यांनी शा‍ब्दिक खेळ केला आहे. तो तसा न करता, ज्या पद्धतीने आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी करावं असंही यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आज उद्घाटन, उमेद मार्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर १ हजार नवीन वस्तू सूचीबद्ध

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *