वर्षा गायकवाड यांची मागणी, आंदोलक विद्यार्थ्यांना धमकाविणाऱ्या पोलिसाला निलंबित करा पोलिसाला तात्काळ निलंबित करून चौकशी करा

नीट NEET पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत असून सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा त्यांना हक्क आहे पण काही पोलीस जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत, धमक्या देत आहेत. मुंबईत एक पोलीस काही विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकून आयुष्य बरबाद करण्याची धमकी देत असल्याचा VDO सर्व सोशल मीडियावर दिसत आहे. या पोलिसाला तात्काळ निलंबित करून त्याची सखोल चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांच्या गाडीत बसवून धमकावले जात आहे, ” जर तुम्ही मला इथे परत सापडलात, तर मी तुमच्या प्रत्येकाच्या खिशात ५० ग्रॅम पावडर (ड्रग्ज) ठेवीन, मग तुम्ही आयुष्यभरासाठी गायब व्हाल, माझ्यापेक्षा वाईट कुणी नाही!” अशी धमकी एक पोलीस देत आहे. ही भाषा कायद्याची नाही, तर गुंडांची आहे. या पोलिसाने आतापर्यंत किती निष्पाप लोकांना धमक्या देऊन त्यांचे आयुष्य बरबाद केले आहे, किती लोकांना खोट्या गुन्ह्यात फसवले आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री, मुंबई पोलीस आयुक्त यांनी याची तातडीने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही केली.

About Editor

Check Also

सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

केंद्र सरकारच्या  धर्तीवर राज्य सरकारी  अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही  १ जानेवारी २०२६ पासून २ टक्के  महागाई भत्ता वाढ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *