चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना जाहीर करण्यात आला आहे.

तसेच ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांना, तर ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना जाहीर करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Editor

Check Also

लोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर! महाराष्ट्राच्या लोककलेला देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून लाभलेल्या सन्मानाचा तो सुवर्णक्षण!

कलेची खरी ताकद कोणती? ती राजसत्तेपुढे झुकण्यात नसते, तर राजसत्तेलाही आपल्या सहजसौंदर्याने भारावून टाकण्यात असते! …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *