मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

केंद्र सरकारवर कडक टीका करताना मल्लिकारजून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मौन बाळगल्याचा आरोप केला. सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवल्यास, विद्यार्थी त्यांना “पुन्हा एकदा धडा शिकवतील,” असा इशाराही दिला.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या “अत्याचारांसाठी” अमित शाह थेट जबाबदार असल्याचा आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच, जबाबदारी टाळून गृहमंत्री “बंद दारांआड लपून राहू शकत नाहीत,” असा टोलाही यावेळी लगावला. २० जुलैच्या घटनांबाबतचे “सत्य” संसदेसमोर मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दलहीही टीका केली.

प्रशासकीय विलंब किंवा अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य धोक्यात येऊ नये किंवा त्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी कालबद्ध वार्षिक शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्याची मागणीही केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित व्यक्ती शैक्षणिक संस्थांचे प्रमुख म्हणून काम करत असल्याचा आरोप मल्लिकार्जून खर्गे यांनी केल्यावर आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्यावर सभागृहात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.

मल्लिकार्जून खर्गे यांच्या या विधानांवर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि सभागृहात गोंधळ निर्माण झाला, ज्यामुळे कामकाजात व्यत्यय आला.

About Editor

Check Also

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, उपचारासाठी इम्रान खान यांना रूग्णालयात हलवा तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्याचे आदेश

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात खितपत पडलेले माजी पंतप्रधान इम्रान खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *