क्रीडा आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीचा लाभ घ्यावा शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण

राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रांतील नोकरीमध्ये ५ टक्के क्रीडा आरक्षणाचा लाभ सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन (Blockchain) व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे खेळाडूंना क्रीडा प्रमाणपत्राची ऑनलाइन पडताळणी करून डिजिटल प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पात्र खेळाडूंनीक्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर ‘क्रीडा ई-प्रमाण’ या पर्यायाद्वारे आधार-संलग्न ओळखीद्वारे लॉगिन करून आपल्या क्रीडा स्पर्धेचा तपशील भरावा व प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर खेळाडूने दिलेली माहिती आणि संबंधित क्रीडा संघटनेने प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या स्पर्धेच्या अभिलेखांची स्वयंचलित पडताळणी केली जाईल.

या प्रक्रियेत माहितीची पडताळणी यशस्वी झाल्यानंतर डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल. या प्रमाणपत्रावर असलेल्या क्यूआर कोडद्वारे त्याची सत्यता तपासता येईल. तांत्रिक कारणामुळे किंवा माहितीतील तफावतीमुळे अर्ज नामंजूर झाल्यास ऑनलाइन अपील करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

क्रीडा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित पदाच्या भरती प्रक्रियेत आवश्यक असलेले वैध क्रीडा ई-प्रमाणपत्र प्राप्त करून त्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र खेळाडूंनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे.

About Editor

Check Also

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या अतिरिक्त जमिनींच्या व्यावसायिक विकासाला वेग • पीपीपी तत्वावर विकासातून एसटीला भरीव उत्पन्नाचा नवा स्रोत • प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा अधिकाधिक व्यावसायिक वापर करून महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *