पंकजा मुंडे यांचे आवाहन, जातीधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी दिला जाती भेदरहित सामाजिक सलोखा- प्रेमाचा संदेश

दुष्काळाच्या काळात पाणी, चारा आणि जनावरांच्या जगण्याचा प्रश्न हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी समाजात जातीधर्माच्या भिंती उभ्या करण्याऐवजी त्या मोडून काढण्याची गरज आहे.त्यामुळे जातिधर्माच्या भिंती तोडून दुष्काळाचा सामना करण्यासाठी एकजुटीने सज्ज व्हा अशी भावनिक हाक राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरुन दिली. संत भगवानबाबा, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या परंपरेच्या दसरा मेळाव्यात अठरापगड जातीतील भक्ती-शक्तीचा एकजीव ‘कुंभमेळा’ आणि जनसागराच्या ‘विराट रूपाचे दर्शन यावेळी पहायला मिळाले.

भगवान भक्तीगडावरील आज झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांचे उर्जादायी मार्गदर्शन झाले. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. त्याचबरोबर सामाजिक सलोखा, जाती भेदरहित एकजूट, आणि जेन -जी च्या प्रमुख मुद्द्यांवर पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत मांडणी केली. व्यासपीठावर माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आर्यमान पालवे, ॲड. यशश्री मुंडे, ना. मेघना बोर्डीकर ,माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, आ.मोनिका राजळे, अक्षय मुंदडा, आ.रत्नाकर गुट्टे, माजी खासदार सुजय विखे, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळराजे पवार , माजी आ.केशवराव आंधळे, माजी आमदार भीमराव धोंडे, प्रा. लक्ष्मण हाके,ॲड. मंगेश ससाने, ह भ प राधाताई सानप, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.

सभेचे प्रस्ताविक डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले तर यावेळी महादेव जानकर ,डॉ. सुजय विखे, धनंजय मुंडे यांची समयोचित भाषणे झाली.
आपल्या तडाखेबंद भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या, या वाघांना ऊन लागत नाही, माझ्या कातड्याचे जोडे करून तुम्हाला घातले तरी तुमचे उपकार फिटू शकत नाहीत. हा दुष्काळातला मेळावा आहे, लग चुकी है तलक जितकी खुदको आदमी छोड देंगे.. मी कधीही कुठला निर्णय घेताना पुढचा विचार केला नाही, मी क्षणात भगवान गडावर भगवान भक्तीगड स्थापन केला की नाही? ही आजची शक्ती आहे, लेकीची शक्ती आहे, गोपीनाथ मुंडेंच्या लेकीची शक्ती आहे. श्वानाला दगड मारल्यास तो ओरडतो, पण आपण मधमाशांच्या पोळ्याला दगड मारलं की ते अंगावर येतो, असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपली ताकद दाखवण्याचं आवाहन केलं.

जातीपातीच्या भिंती मोडून काढा
——–
आपल्याला अशी तरुण पिढी नको जी देशभक्त नाही, देशाबद्दल आदर नाही. जयप्रकाश नारायण यांसारख्यासोबत काम केले, गोपीनाथ मुंडे सारखे सैनिक तयार केले. तुम्ही खरे झेन झी आहात, आमचा आर्यमान पण जेन झी आहे. पुरुष नेतृत्व जेन-झींना करायचं आहे. आपल्याला माणसा माणसात भिंत उभी करायची नाही. आपल्याला धर्माच्या नाही तर जातीच्या भिंती मोडून काढायच्या आहेत, असे म्हणत पंकजा मुंडेंनी जातीभेदाला थारा न देण्याचं आवाहन केलं.

दुष्काळ गरीब श्रीमंती पाहत नाही
———
दुष्काळामध्ये जाती-धर्माच्या भीती तोडून काढायच्या आहेत. मी जालन्यातील अंतरवली गाव दत्तक घेतलं आहे, मी आंतरवलीचा विकास करणार आहे. बीडमधल्या गावाचा विकास कसा केला तसा अंतरवलीचा विकास करणार आहे, असेही पंकजाताई मुंडेंनी म्हटले. जातीपातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भविष्य नाही, शिक्षण नसलेला विचारी नाही तर विषारी असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

दुष्काळात मी तुमची सावली होईल
———
भीड मे खडा होना मक्सद नही है मेरा, भीड जिसके लिए खडे होती है वह बनना है मुझे… अशी शायरी म्हणत नेतृत्वाचा संदेश पंकजा मुंडे यांनी दिलाय. माझ्या मनात स्वार्थ असला असता तर तुम्ही इथं आला असतात का? माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, हा देश व्यसनाच्या आधीन झाला आहे. व्यसन सोडण्याचा आवाज केला तरी व्यसन सोडलं पाहिजे, मी तुम्हाला आवाहन केलं लेकीला जन्म घेऊ द्या, मी मागचा दुष्काळ हाताळला होता, हाही दुष्काळ हाताळू. सीएसआर फंडातून मी चारा पोहोचवण्यासाठी, अनुदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करुन सावली बनण्याचं काम करेल, असेही त्यांनी म्हटले. दुष्काळात आपल्याला एक मोठे काम करायचं आहे. ये पेड के पत्ते शाखे भी परेशान हो जाते, अगर परिंदे भी हिंदू मुसलमान हो जाते.. अशी शायरी म्हणत पंकजाताई यानी जाती-धर्मावर प्रहार केला. मी टोपलं आणि खोरं घेऊन तुमच्या नदीचं संवर्धन करण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

आता राजकारणात सकारात्मकता पाहिजे आहे. नगद नारायण आणि गहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ गडाला मी नमन करते, आमचा दसरा मेळावा का कुणाच्या डोळ्यात खुपावा. सगळ्या समाजाचं भलं करण्यासाठी हृदयात प्रेम, भविष्याची जाणीव लागते, तोंडातून चांगलं बोलावं लागतं, संस्कार लागतात, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले.
………………..
क्षणचित्रं
● दसरा मेळाव्यासाठी ना. पंकजाताई मुंडे, डाॅ. प्रितमताई मुंडे, ॲड यशःश्रीताई मुंडे आर्यमन पालवे यांचे खास हेलिकॉप्टरने आगमन
● राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, धनंजय मुंडे, मोनिका राजळे यांचे देखील दुसर्‍या हेलिकॉप्टरने आगमन झाले.
● हेलिपॅड ते व्यासपीठापर्यंत आ. पंकजाताई व प्रितमताई यांचे कार्यकर्त्यांकडून वाजतगाजत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत
● व्यासपीठावर येण्यापूर्वी स्मारकातील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीचे दर्शन व पूजा करून ना. पंकजाताईंकडून आरती
● व्यासपीठावर येताच ना. पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसागराला वंदन केले तसेच साडीच्या पदराने त्यांची नजर काढली.
● संत भगवान बाबा स्मारक ट्रस्ट, सावरगाव घाट ग्रामपंचायत तसेच ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीने त्यांचे ऊसाची मोळी व दुर्गामातेची मूर्ती देऊन स्वागत
● मराठा, धनगर, बंजारा, माळी, गुजर आदी समाज बांधवांच्या वतीने ना. पंकजाताई यांचा सत्कार करण्यात आला.
● डाॅ. प्रितमताई मुंडे, सुजय विखे, महादेव जानकर, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांची यावेळी समयोचित भाषणे झाली.
● मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून अठरा पगड जातीचे लोकं मिळेल त्या वाहनाने आणि घरची चटणी भाकरी घेऊन अतिशय उत्साहाने प्रचंड मोठया संख्येने सहभागी झाले.
● मेळावा शांततेत, शिस्तीत पार पडला. पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांची मागणी, SIR प्रक्रियेत अनेक त्रुटी आणि अनियमितता, जाणीवपूर्वक नावे वगळणाऱ्यांवर कारवाई करा सत्ताधारी पक्षाचा फायदा होण्यासाठी विशिष्ट मतदारांची नावे वगळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे चोकलिंगम यांचे आश्वासन

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया अत्यंत किचकट असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *