सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होणं चिंताजनक पुण्यात न्यायालयात गोळीबाराची घटनेनंतर सरकारवर केली टीका

राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना निधी मिळाला की नाही, याचा डेटा आदरणीय शरद पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मागवला असून आज मुंबईतील बैठकीत पुढील १ ते २ महिन्यांचा कार्यक्रम ठरेल,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सु्प्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, हा अत्यंत भावनिक विषय आहे. तो दिवस आम्ही स्वतः अनुभवला आहे. २६/११ च्या रात्री मी मुंबईतच होते. माझे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला वहिनी आणि स्मृती शिंदे यांच्यासोबत आम्ही जेवण करत असताना हल्ल्याची माहिती मिळाली. आमचे काही मित्र तिथे अडकले होते, त्यांना धीर देण्यासाठी आम्ही गाडीने निघालो,मात्र पोलिसांनी विल्सन कॉलेजजवळ आमची गाडी अडवून पुढे जाण्यास मज्जाव केला. या हल्ल्यात सदानंद सुळे आणि मी आमचे ३ ते ४ जवळचे मित्र गमावले, हा आमच्यासाठी खूप मोठा वैयक्तिक धक्का होता, असे म्हणाल्या.

सु्प्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर असून, विश्वासाच्या नात्याने केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात,अशा पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होणं हे अतिशय चिंताजनक आहे.पुण्याच्या सुरक्षिततेसाठी आम्ही राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करू. कालच मी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून व संपर्क साधून यावर गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात मी कधीही कोणावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. महाराष्ट्राचे पोलीस अतिशय उत्तम आहेत आणि ते शेतकऱ्यांचीच मुले आहेत, मात्र त्यांच्यावर बसलेल्या प्रशासकांनी आता उत्तरदायित्व घेतले पाहिजे, असेही स्पष्टपणे सांगितले.

सु्प्रिया सुळे म्हणाल्या की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम समतेचे संविधान दिले. त्यामुळे आपण सर्वांनी एकाच स्वरात आणि अंतःकरणातून समतेची भाषा बोलायची असेल, तर कायदे आणि नियमही सर्वांसाठी समान असले पाहिजेत,असे स्पष्ट केले.

शेवटी बोलताना सु्प्रिया सुळे म्हणाल्या की,सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे,वैयक्तिक टीका करणं हे माझं राजकारण नाही आणि मी नेहमीच हे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे व्यक्तींवर वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा मी प्रशासन आणि यंत्रणेवर बोलेन. कारण समस्या प्रशासन आणि यंत्रणेची असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक

दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन संवेदनशील आहे. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *