कर्जमाफीच्या कामासाठी आज आणि उद्या बँका सुरु राहणार सर्व जिल्हा सहकारी बँकासह इतर बँकांना कार्यालये सुरु ठेवण्याच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील ४१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने १९ हजार ५३७ कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी दिली. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासह इतर कर्जमाफीच्या कामाकरीता राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकासह बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज शनिवार ९ डिसेंबर आणि रविवारी १० डिसेंबर २०१७ रोजी सुरु ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने बँकांना दिले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रविण परदेशी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे बँकांशी संवाद साधला. त्यावेळी कर्जमाफी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी बँकांनी शनिवारी आणि रविवारी बँका सुरु ठेऊन पात्र खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासंदर्भात विनंती केली. त्यास बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

व्हिडिओ कॉन्फरंसिंग बैठकीच्या माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बँक आणि जिल्हा निहाय आढावा घेण्यात आला. ज्या खातेदारांच्या बँक खात्यात कर्जमाफीची, वन टाईम सेटलमेंटची तसेच प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झाली आहे. त्या शेतकऱ्याला त्याची माहिती मिळेल, हेही बँकांनी प्रयत्न करावेत अशी सूचनाही परदेशी यांनी बँकांना केली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र खातेदारांची यादी बँकांना देण्यात आली असून बँकांनी या खातेदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्याच्या कामाला सुरुवात केली. काही बँकांनी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल त्यांनी बँकाचे अभिनंदनही केले.

 

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही खतांचे लिंकींग बंद आदेशाची अंमलबजावणी करणार कृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांचा संप मागे

कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेले लिंकींग बंद होण्याबाबत उत्तर प्रदेशने जो आदेश काढला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *