Editor

विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या विरोधात मविआचा उमेदवार विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडाळीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावरील या शिंदे सरकारला ३ आणि ४ जुलै रोजी बहुमत सिध्द करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. राज्यपालांनी विधानसभेच्या अध्यक्ष …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान, हे सरकार फार काळ… भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रासंगिक करार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाळी माजवित एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यानंतरही १० दिवसानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकिय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरीकांमधून वेगवेगळ्या पध्दतीचे तर्क व्यक्त करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारला …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, कोणत्या कायद्याच्या आधारे अध्यक्ष पदाची निवडणूक घेणार? महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या कायद्यानुसार की जून्या कायद्यानुसार

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील सुप्त तरी कधी उघड संघर्ष सातत्याने पहायला मिळाला. तसेच काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने अध्यक्ष पदाच्या कायद्यात दुरूस्ती करत त्या आधारे निवडणूक प्रक्रिया जाहिर करावी अशी मागणी केली. परंतु राज्यपालांनी रिक्त अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया जाहिरच केली …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले ‘हे’ आदेश काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

राज्यातील सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील समिती सभागृहात …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ‘या’ शासकिय पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी मुदतवाढ विशेष तुकडी प्रवेशासाठी अर्ज करण्यास ७ जुलैपर्यंत मुदतवाढ

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरु असून विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता ७ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हिंगोली, जालना, अंबड (जि. जालना), लातूर, नांदेड, वांद्रे (मुंबई), रत्नागिरी, ठाणे, ब्रम्हपुरी (चंद्रपूर), जळगाव, पुणे, कराड (जि. सातारा) आणि सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक) …

Read More »

फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद का स्विकारले? चंद्रकांत पाटील यांनी दिले ‘हे’ उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या त्यागाचा भाजपाला अभिमान

भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसेच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, कोणाचे हितसंबंध जोपासण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ ? आरेमध्ये कारशेड करण्याचा भाजपप्रणित सरकारचा निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत मुंबई मेट्रो कारशेड आरे मध्येच होईल असे जाहीर करून भाजपप्रणित राज्य सरकारने पहिला घाव मुंबईकरांवर घातला आहे. पर्यावरणाचा विचार करून आरे मधील कारशेड कांजूरमार्ग येथे करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु पुन्हा आरेमध्येच कारशेड करण्याचा आग्रह धरणे म्हणजे मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे, …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, यांची तर दोन चाकी स्कुटर; मात्र हँडल… हँडल असलेला व्यक्ती जिथे हवी तिथे स्कूटर नेणार

राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा त्याला तीन चाकांची ऑटोरिक्षा असलेले सरकार म्हणून संबोधण्यात आले. मात्र काल महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आले. ही दोन चाकांची स्कूटर आहे. या सरकारमध्ये पुढे बसलेल्या माणसाकडे स्कूटरचे हँडल नसून मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात हँडल आहे तो जिथे हवी तिथे स्कूटर घेऊन जाईल …

Read More »

शिंदेंना सावध शुभेच्छा, तर राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचे पत्र पाठवत कौतुक वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल…

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांची काल अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना किमान तुम्ही तरी सावध पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही… एकनाथ शिंदे यांच्या कथित दाव्यावरून उध्दव ठाकरे यांचा पलटवार

शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कालच नव्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. परंतु राज्यात नव्याने आलेल्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट …

Read More »