Editor

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, …आता राज्य करायला उसंत मिळेल भेट देण्याच्या उपक्रमावरून लगावला टोला

सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार असून आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला मदत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि संघाने केलेल्या नुकसानीची भरपाई करतोय अध्यक्ष पदाच्या निवडणूकीपासून अलिप्त नाही

काँग्रेसचा लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. त्यातच मागील काही दिवसांपासून सातत्याने काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांचा आणि राहुल गांधी यांच्यात एकप्रकारचा छुपा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे काँग्रेस दुभंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर जाणे स्विकारल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत …

Read More »

राष्ट्रवादीचा सवाल, नवनीत राणांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देतील का? भाजपाकडून राज्यात सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाच शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत …

Read More »

भास्कर जाधव यांचा पलटवार, त्याचं थडगं तुम्ही उभ केलं याकूब मेननवरील भाजपाच्या वादावर केला पलटवार

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्याला …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला, …किमान उंची बघुन तरी डोकं आपटा नवीन व्याख्येप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता नाही

भाजपा आणि शिंदे गटाकडून सातत्याने ठाकरे सरकारने सणांवर निर्बंध लादल्याचा आणि शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध काढल्याच्या जाहिराती भाजपा आणि शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ‘हिंदूंचा सण निर्बंधमुक्त’ अशी बॅनरबाजीही झाली. यावरून भाजपा-शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालेले असताना आता त्यात …

Read More »

शिंदे गटाला पडला प्रश्न, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी लोकं कुठून आणायची? उध्दव ठाकरे यांना तोडीस तोड द्यायचे कसे

मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र आता पर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणून मुंबई, ठाण्यासह राज्यातून लोक न बोलविता या मेळाव्याला यायचे. पण आता मेळावा घ्यायचा तर लोकं आणायची कुठून असा …

Read More »

मुनगंटीवार यांची घोषणा, बॉटनिकल गार्डनला वाजपेजींचे नाव अन ताडोब्यात नवी सफारी विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे. काही …

Read More »

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय डॉक्टरांच्या निगराणीखाली प्रकृती अस्वस्थामुळे डॉक्टरांचा निर्णय

जगभरातील आदराचे स्थान मिळविलेल्या आणि अनेक घडामोडीनंतरही आपले राणी पद टिकवून ठेवलेल्या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती बिघडली आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नसले तरी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बर्मिगहॅम पॅलेसच्यावतीने देण्यात आली आहे. मागील ऑक्टोंबर महिन्यापासून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती ठीक नाही. …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज… व्हॉटस्ॲप मेसेजचा निरोप सांगून खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ठेवले बोट...

राज्यात गणपती आणि अनेक सण होत राहतील, त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून मायबाप जनतेची सेवा करतील असा निरोप व्हॉटस्ॲप मेसेजवरून मिळाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोट ठेवले. घाटकोपर येथे गणपती दर्शन घेत असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर …

Read More »