राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारच सावध शुभेच्छा दिल्या. तसेच किमान तुम्ही तरी सावध पावले टाका अशा शुभेच्छा ट्विट करत दिल्या. या ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नेमके कोणापासून सावध रहा …
Read More »शिंदे सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवार म्हणाले, फडणवीस नाराज मनाने… एकनाथ शिंदे आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री योगायोगाने साताऱ्याचे
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन २४ तास उलटत नाही तोच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी आज झाला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी नाराज मनाने उपमुख्यमंत्री पद स्विकारल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपामधील असंवादावर बोट ठेवण्याचा प्रयत्न …
Read More »मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले सर्वांना सोबत घेवून विकास करणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे …
Read More »राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची शपथ राजभवनात झाला समारंभ भाजपाचे अनेक केंद्रीय मंत्री आणि आमदार सहभागी
राज्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून २४ तासही उलटत नाही, तोच राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ दिली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ …
Read More »अखेर शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आधी ना ना, नंतर हा हा पंतप्रधान मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि अमित शाह यांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा निर्णय
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केला. तसेच या सरकारमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचे आवाहन केले. …
Read More »भाजपाने पाठिंबा जाहिर केल्यानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पदाची लालसा नाही हिंदूत्व आणि विकासासाठी ५० आमदारांचा निर्णय
तब्बल १० दिवसानंतर मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उतरताच थेट देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे काही काळ देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरिष महाजन यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर हे सर्वजण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले. तेथे गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांच्याकडे नव्या सत्ता …
Read More »ठाकरेंच्या आव्हानाला भाजपाकडून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून उत्तर, राज्यात शिदेंसरकार आजच होणार मुख्यमंत्री पदाचा शपथविधी
राज्यातील शिवसेनेतील बंडाळीमुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिला. मात्र काल मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहिर करताना माझ्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला तर मला आनंदच आहे असे सांगत एकप्रकारे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले. उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …
Read More »बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणाले, तर त्या १६ जणांची आमदारकी धोक्यात उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तानाट्याला सुरुवात
२४ तासापूर्वी शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या १६ आमदारांवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून अपात्रतेच्या कारवाईचा बडगा उगारला होता. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही लढाई लढली गेली. मात्र ती अद्याप अनिर्णित स्थितीत आहे. तर दुसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या आमदारांची संख्याही १६ आहे. आता या १६ …
Read More »उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावर १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया गोवा विमानतळावर बोलताना प्रतिक्रिया दिली
सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड क्षमविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपयश आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अखेर काल रात्री ९.३० वाजता आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक पाहता पक्षप्रमुख ठाकरे …
Read More »
Marathi e-Batmya