Editor

मंत्री असतानाही उमेदवारी का नाही? सुभाष देसाईंनी दिले “हे” उत्तर विधान परिषदेत निवडणूकीतील पत्ता कटवरून देसाईंचा खुलासा

राज्यसभा निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला. या निवडणूकीत शिवसेनेकडून विद्यमान मंत्री सुभाष देसाई यांचा पत्ता कट त्यांच्याऐवजी सचिन अहिर यांना तर दिवाकर रावते यांच्या जागेवरून आमश्या पाडवी अशा दोन चेहऱ्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यापार्श्वभूमीवर सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले मंत्री सुभाष देसाई यांना निवडणूक का लढवित …

Read More »

राज्यसभा निवडणूकः ईडी म्हणते, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही न्यायालयाकडून अंतिम निर्णयाची अपेक्षा

राज्यसभा निवडणूकीत मतदान करता यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी तात्पुरता जामिन मिळावा याकरीता न्यायालयात अर्ज दाखल केला. तसेच मतदान करण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळावा अशी मागणीही केली. त्यावरील आज झालेल्या सुनावणी दरम्यान सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने विरोध केला. त्यामुळे या दोघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने …

Read More »

पंकजा मुंडेंना डावलत भाजपाकडून फडणवीसांच्या मर्जीतील “या” पाच जणांना संधी चार नवे तर एक जूना असे मिळून पाच जणांची यादी जाहिर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहिर झाल्यानंतर भाजपाकडून सर्वप्रथम भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्यांदा चर्चेत आले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातून सध्या बाजूला फेकल्या गेलेल्या पंकजा मुंडे यानिमित्ताने पुन्हा सक्रिय होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच पुन्हा त्यांचे तिकिट कापण्यात आले. तर त्यांच्या ऐवजी नवोदित भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा …

Read More »

विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज मंत्री सुभाष देसाईं घरी बसणार का?

राज्यसभेच्या निवडणूकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता विधान परिषद निवडणूकीची वावटळ सुरु झाली. या वावटळीत शिवसेनेकडून अधिकृतरित्या नाव जाहीर झाली नाहीत. मात्र आज शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि नंदूरबार येथील आमश्या पाडवी या दोघांना उमेदवारी जाहिर झाली. तसेच या दोघांनी आज विधानभवनात येवून विधान परिषदेकरीता अर्जही भरला. वाचा …

Read More »

शाळांना मिळणार वाढीव अनुदान उपमुख्यमंत्र्यांची मान्यता-मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

१३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या/ अतिरिक्त शाखावरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के अनुदान व ज्या शाळा २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि काही शाळांच्या त्रुटींमुळे अनुदान सुरू करता आले नव्हते. …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, शेतकरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे १ जुलै या कृषीदिनापासून वाटप

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप १ जुलै या कृषी दिनापासून करण्यात येणार आहे. कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही लवकरच …

Read More »

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व …

Read More »

सह्याद्रीवरील ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ भारदस्त आवाज लोपला ज्येष्ठ वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन

काही वर्षांपूर्वी दुरदर्शनवर मराठी बातम्यांना सुरुवात झाल्यानंतर ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ अशी धीर गंभीर आवाजात सुरुवात करत बातम्या पाहणाऱ्या प्रेक्षकाला टिव्हीसमोर खिळवून ठेवणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे यांचे आज मुंबईत वयाच्या ६४ व्या वर्षी आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी सुजाता आणि एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे असा …

Read More »

१२ वीचा निकाल उद्या, पण पाहणार कोठे? ही आहेत संकेतस्थळे दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार ऑनलाईन निकाल

१२ वी परिक्षेचा निकाल कधी जाहिर होणार याबाबतची सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी निकालाची तारीख जाहिर केली असून हा निकाल उद्या ८ जून २०२२ रोजी जाहिर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून हा …

Read More »

मेट्रो कारशेड वाद; केंद्राची न्यायालयात स्पष्टोक्ती, कांजूरची जागा आमचीच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

मेट्रो कारशेडवरून काहीही करून कांजूर मार्ग येथील जागेत उभारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आग्रही आहेत. तर दुसऱ्याबाजूला केंद्राच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसीतील जागा न देण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे. या दोन्ही जागांवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आज केंद्र सरकारने कांजूर मार्गची जागा आमचीच असल्याचे …

Read More »