महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून राष्ट्रवादीच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष …
Read More »अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा शासनाचा प्रयत्न प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेतील नूतन संकुलाचे लोकार्पण
कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षणाला चालना देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विशेषत: महिलांना शेतीपूरक व्यवसाय आणि प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यावर विशेष भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हवेली तालुक्यातील वडमुखवाडी (चऱ्होली) येथील प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाच्या …
Read More »देशातील पहिले ”मधाचे गाव” प्रकल्पाचा ”मांघर” गावी शुभारंभ राज्यातील इतर जिल्ह्यात मधाचे गाव प्रकल्प राबविण्यात येईल-मंत्री सुभाष देसाई
मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील असे प्रकल्प राबवण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे ‘मधाचे गाव’ म्हणून मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत आज घोषित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार मकरंद पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व …
Read More »अधिकारी संघटनेची मागणी: महसूलसह सर्व विभाग स्टेट केडरमध्ये समाविष्ट करा चेन्नई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने निर्णय घेण्याची मंत्रालयीन अधिकारी संघटनेची मागणी
महाराष्ट्राची स्वतंत्र राज्य स्थापना झाल्यापासून स्वंतत्र प्रशासकिय यंत्रणा निर्माण करण्यात आली. मात्र या प्रशासकिय यंत्रणेत येणाऱ्या सर्व विभागांना स्टेट केडर म्हणून मान्यता अद्याप मिळाली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या उपजिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी पदेच आणि इतर जे राज्य सरकारला वाटेल त्या विभागातील समकक्ष पदावरील व्यक्तींना केंद्रीय सेवेत अर्थात …
Read More »अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्री इराणींच्या कार्यक्रमात केले आंदोलन पोलिसांनी नंतर महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काढले बाहेर
वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून कधीकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या स्मृती ईराणी यांना पुन्हा एकदा वाढत्या महागाईची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने सुरुवातीला त्या ज्या हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. त्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरले. मात्र बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात …
Read More »मुख्यमंत्र्यांची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे टीकास्त्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला काळीमा फासणारी होती. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हितासाठी काय केले हे एका शब्दानेही सांगता येत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळी करून मुख्यमंत्रीपदाची अप्रतिष्ठा केली अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर चितळेप्रकरणी सदाभाऊ खोतांची सारवासारव आधी अभिमान असल्याचे वक्तव्य केले नंतर मात्र मी तिच्या त्या पोस्टचे समर्थन नाही
भाजपा पुरस्कृत माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुरुवातीला केतकी चितळे हिचा अभिमान वाटतो असे जोरदार वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात घुसून खोत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यानंतर मात्र त्यांनी सारवा सारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून आले. हा प्रकार …
Read More »उखाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात लवकरच मान्सून: फक्त पाच दिवस बाकी १५ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाची शक्यता
मागील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतात तापमानात वाढ झालेली असल्याने उन्हाच्या रखरखीने राज्यातील जनतेला चांगलेच हैराण करून सोडले. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर वातावरणात थोडासा गारवा निर्माण व्हावा यासाठी मान्सूनच्या सरी कधी कोसळतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असताना मान्सूनने अंदमानच्या बेटावर आपली हजेरी …
Read More »नाना पटोलेंच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले, फार महत्व देण्याचे कारण नाही काँग्रेस श्रेष्ठींकडे केली पटोलेंनी तक्रार
विदर्भातील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला डावलून भाजपाशी हात मिळवित सत्ता हस्तगत केली. याप्रकरणावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, त्यावेळी फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजायचे आता… मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर निशाणा
हा काळ इतिहास जमा होईल तेव्हा होईल पण या पुस्तकाच्या प्रति आजच काही जणांना घरी पाठवल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये सर्व प्रार्थनास्थळे बंद होती आणि फक्त ॲम्बुलन्सचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजायला लागत आहेत अशी खोचक टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंसह विरोधकांवर करत म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya