राज्यसभेतून १५ राज्यांतील ५७ सदस्य निवृत्त झाल्याने त्यासाठी आज मतदान घेण्यात आले. एकूण ५७ जागांपैकी ११ राज्यांतील ४१ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. तर उर्वरित जागांवर मतदान घेण्यात आले असून त्या ठिकाणची मतमोजणीला लवकरच पार पडणार आहे. रात्री उशीरा पर्यंत चार राज्यातील १६ जागांचे निकाल हाती येणार आहेत. त्याचवेळी …
Read More »एमआयएमचा पाठिंबा, त्यावर भाजपाची टीका तर भास्कर जाधवांचे प्रत्युत्तर भाजपाची बी टीम, सी टीम कोण अख्ख्या देशाने पाहिलंय
राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अखेर एमआयएमने आपल्या दोन आमदारांचा पाठिंबा अखेर काँग्रेसला जाहिर केला. तत्पूर्वी एमआयएमने आपला पाठिंबा महाविकास आघाडीला देण्याची तयारी दर्शविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेतील माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. मात्र आज सकाळी मतदानाच्या दिवशीच असुदद्दीन ओवेसी यांनी …
Read More »भाजपाने घेतला या मंत्री आणि आमदाराच्या मतदानावर आक्षेप पण… निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला आक्षेप
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत अखेरपर्यंत २८१ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र भाजपाने मतपत्रिका एकालाच दाखविण्याऐवजी अनेकांना दिसेल असे दाखविल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या दोन मंत्र्यांवर आणि एका आमदारावर आक्षेप घेतला. महाराष्ट्र विधानसभेत आज राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात होते. भाजपाकडून महाविकास आघाडीच्या …
Read More »भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी आले आजारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक दोघेही अॅम्ब्युलन्समधून आले एक जण व्हिल चेअर तर दुसऱ्याला स्ट्रेचरवरून आणले
राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असताना आज दोन परस्पर विरोधी चित्र पाह्यला मिळाले. त्यातील एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान करता यावे याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या दोन आमदारांनी स्वतःची शाररीक स्थिती आणि आरोग्य चांगले …
Read More »नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची १३ जूनला सोडत राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश
ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच न्य़ायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश देत दोन आठवड्यात त्याची प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरु केली. काही दिवसांपूर्वी शहरातील महापालिकांच्या निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यापाठोपाठ …
Read More »जिल्हा परिषद शिक्षकांसाठी चांगली बातमी; बदलीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही- हसन मुश्रीफ
ग्रामविकास विभागामार्फत होणारी जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे. कोरोना काळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. मात्र, आता या ऑनलाईन संगणकीय प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. राज्यात आजमितीस जवळपास २ लाख प्राथमिक शिक्षक असून या प्रणालीमुळे बदली प्रक्रियेत …
Read More »१५ जूनपासून शाळा सुरु राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून शाळा सुरु
मागील दोन वर्षापासून राज्यात कोविडमुळे शालेय शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले. त्यामुळे जवळपास १ ली ते १० पर्यंतच्या विद्याथ्यांच्या परिक्षाही घेता आल्या नाहीत. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने विस्कळीत झालेले शाळांचे वार्षिक वर्ष नियोजित पूर्वपदावर आणण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने १३ जून पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला असून १५ …
Read More »पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर शिवसेना नेते अर्जून खोतकरांनी दाखविली “ही” तयारी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण पण निर्णय नेतेच घेतील
राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकींचा धुराळा उडायला सुरुवात झाली. चर्चेत असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याने औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष …
Read More »बार्टीमार्फत यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यी संख्येत १०० ने वाढ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा
सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक २०० विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या १०० ने वाढवून ३०० करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. दरवर्षी बार्टी मार्फत विशेष चाचणी परिक्षा …
Read More »मीम्सचा चेहरा बनलेले पाकिस्तानचे अँकर आमीर लियाकत हुसैन यांचे निधन वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय
भारतातील जवळपास अनेक मीम्समध्ये दाढीवाल्या एका व्यक्तीचा हसतानाचा आणि वाह.. वाह असे म्हणताचा व्हिडिओ आपण सर्रास पाहिला असेल. त्या व्यक्तीची माहिती फारशी कोणाला माहिती नाही. परंतु त्या व्यक्तीचा व्हिडिओ अनेक मीम्समध्ये वापरला गेल्याने ती व्यक्ती म्हणजेच मीम्स अशी एकप्रकारे समीकरण जुळले होते. मात्र त्या दाढीवाल्या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून …
Read More »
Marathi e-Batmya