Editor

…ही किमया राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते नागरिकांनी भाजपारुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे- महेश तपासे

पुण्यातील हनुमान मंदिरात आरती आणि मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन ही किमया फक्त सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते ती भाजप करू शकत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात व देशामध्ये सांप्रदायिकतेचा नाग पुनश्च एकदा आपला फणा काढून …

Read More »

आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद

भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा, चंद्रकांत पाटलांना हा ही मतदारसंघ सोडावा लागेल तर मी ही हिमालयात जाईन

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या तर हिमालयात जाईन या वक्तव्यावरून निशाणा साधला असून ते जर हिमालयात जाणार असतील तर मी ही त्यांच्यासोबत हिमालयात …

Read More »

विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर

कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …

Read More »

मंत्री थोरात म्हणाले, भाजपाला सतेज बंटी पाटील पुरून उरले कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले

कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर …

Read More »

नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आता पुण्यातून पलायन करावे ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

पराभवनानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मताधिक्य जास्त नाही हुरळून जावू नका कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये असा इशारा देत या निवडणुकीत भाजपाची मते वाढली …

Read More »

राज ठाकरेंच्या आधीच नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्यांकडून अमित शाहंना पत्र मस्जिदीवीरल भोगें काढण्यासंदर्भात लिहीले पत्र

गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात मस्जिदीवरील भोंग हटविण्यासह मदरशांवर धाडी टाकण्याबाबत आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार असल्याचे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्यावेळी जाहीर केले होते. तसेच जर मस्जिदीवरील भोंगे नाही उतरवले तर मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावत हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा दिला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे …

Read More »

काँग्रेसने मविआची जागा राखली, तर जयश्री जाधव म्हणाल्या “स्वाभिमान राखला” सतेज बंटी पाटीलांचे रणनीती आली कामाला

मागील काही दिवसांपासून राज्यात भाजपाने हिंदूत्व आणि भोंगा विरूध्द आरती असा नवा राजकिय सामना सुरु केल्यानंतर मनसेने त्यात उडी घेतल्याने उत्तर कोल्हापूरची पोट निवडणूक आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका याच मुद्यावर लढली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. मात्र या दोन्ही मुद्यांना उत्तर कोल्हापूरकरांनी फारशी भीक न घालता काँग्रेसच्या …

Read More »

ऊर्जा मंत्र्यांची स्पष्टोक्ती, कोल इंडियामुळे ही परिस्थिती पण ग्रामविकासचे पैसे मिळाले असते तर… वीज भारनियमनावरून ऊर्जामंत्री राऊत यांचा केंद्र आणि राज्यावर निशाणा

वीज भारनियमनाची परिस्थिती एकट्या महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशभरात आहे. देशाला कोळसा पुरवठा करणाऱ्या कोल इंडिया लिमिडेटच्या व्यवस्थापनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केला असून पण राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून ८००० हजार कोटी मिळाले असते तर आमची कुचंबना झाली नसती असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र …

Read More »