Editor

व्यापाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केली “ही” अभय योजना ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - २०२२’ अभय योजना

कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२’ अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली. कर कायद्यातंर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये १० हजार रुपयांची थकबाकी असल्यास सदर थकबाकीची रक्कम संपूर्णपणे माफ …

Read More »

अजित पवार म्हणाले, सिहांसनाधिष्ठीत पुतळा आहे, काय अभिवादन करायचे ते करा भाजपा आमदार मुनगंटीवारांच्या प्रश्नावरून पवारांनी दिले उत्तर

तिथीनुसार साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित करत नेमकी शिवजयंती कोणत्या तारखेची असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एका पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे …

Read More »

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, शिवजयंती नेमकी कधीची खरी, तारखेची की तिथीची? मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीवरून केला मुद्दा उपस्थित

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार हे बोलण्यास उभे रहात म्हणाले, अध्यक्ष महोदय राज्यात ज्या दिवशीही महापुरूषांची जयंती असले, त्यादिवशी सभागृहात महापुरूषांच्या फोटोची फ्रेम सभागृहात लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारी रोजी शासकीय तारखेनुसार जयंती साजरी करण्यात आली. मात्र आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी …

Read More »

एमआयएम आणि द काश्मीर फाईल्स सिनेमावर शरद पवारांची म्हणाले… राष्ट्रीय समितीने राज्याला अधिकार दिलेले नाहीत

मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबतचा प्रस्ताव एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाझ जलील यांनी तिन्ही पक्षांना दिल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी तर एमआयएमसोबत आघाडी शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, …

Read More »

कोविशिल्डच्या दोन लसीतील अंतर कमी होणार, एनटीएजीआयचा सल्ला बारा ते सोळा आठवड्यानंतर आठ ते १६ आठवड्यानंतर मिळू शकतो दुसरा डोस

मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या महामारीतून वाचण्याचा प्रयत्न जगाकडून करण्यात येत आहे. या संसर्गाच्या आतापर्यत काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी दोन वेळा लाट येवून गेली आहे. मात्र हा विषाणू काही केल्या जायला तयार नाही. मात्र या विषाणूपासून बचाव करून घेण्यासाठी विविध लसी बाजारात आलेल्या आहेत. यातील सर्वात प्रभावी म्हणून …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या मोदी बाबतच्या वक्तव्यावर काँग्रेसने दिला “गीता” मधील संदर्भ नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपतात आता झोप येवू नये म्हणून प्रयत्न करतायत

मागील काही महिन्यापासून महाविकास आघाडीवर कुरघोडी करण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. त्यातच आता भाजपाच्या कुरघोडीच्या राजकारणाला तितक्याच आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त दोन तास झोपत असल्याचे सांगत आता ते झोप येवूच नये यासाठी प्रयत्न करत …

Read More »

पोलिस भरती होवू इच्छिणाऱ्यांसाठी खुषखबर ! NCC प्रमाणपत्र असल्यास मिळणार गुण क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना आगामी काळात ७ हजार २३१ पदांवर पोलिस शिपाई भरती करणार असल्याचे जाहीर केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातच एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते …

Read More »

पत्रिकेत नाव छापलं नाही म्हणून पंकजा मुंडे झाल्या धनंजय मुंडेंवर नाराज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही मात्र नक्की दाखवू

राज्यात मुंडे बहिण-भावातील राजकिय कुरघोडीमुळे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो. कधी निवडणूकीच्या निमित्ताने तर कधी साध्या साध्या गोष्टींवरील वक्तव्यावरून. मागील काही दिवसांपासून बीडच्या बदनामीच्या मुद्यावरून मुंडे बहिण-भावात चांगलेच शाब्दीक युध्द रंगले असतानाच जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर नाव छापलं नाही म्हणून नाराज झालेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या …

Read More »

जनाबसेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर जनाबसेना म्हणणाऱ्यांनी आपला इतिहास, भूतकाळातील कर्तबगारी तपासावी

आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जनाबसेना म्हणत टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यास शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, भाजपाकडून आमच्याविरोधात जे गैरसमज पसरलवे जात आहेत, त्यातून त्यांचा जळफळाट बाहेर पडत आहे त्याला उत्तर द्यायचे आहे. आम्हाला जनाबसेना …

Read More »

शिवसेनेच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिली जुली कुस्ती एमआयएमच्या प्रस्तावावरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीला अद्याप अवकाश असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कधीही होवू शकतात. यापार्श्वभूमीवर राज्यात नव्या राजकिय समीकरणांच्या अनुषंगाने एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली तरी भाजपाचे विरोधी पक्षनेते …

Read More »