Editor

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे प्रतिष्ठीत नेते, आमचं सरकार लक्ष देईल मुख्यमंत्री प्रकरण हाताळत आहेत

काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वर हल्ला करत आंदोलन केले. या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यात न्यायालयानेही सदावर्तेंना दोन दिवस पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या …

Read More »

सदावर्तेंना दोन दिवस पोलिस तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी जामीन अर्ज फेटाळला

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्या १०९ जणांबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर आज किल्ला कोर्टात या सर्वांना हजर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीत गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यापैकी १०९ जणांना …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणते, पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करा - महेश तपासे

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला करुन राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न होता का? पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी करत त्यामुळे पवारसाहेबांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

फडणवीसांचा सवाल, माध्यमे पोहोचली मग पोलिस का उशीरा पोहोचले? तेव्हा पोलिस काय करत होते

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्ला करत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध करत कोणत्याही नेत्यांच्या घरावर जावून अशा पध्दतीचे आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मतही ट्विट करत व्यक्त केले होते. मात्र आज …

Read More »

गोपीचंद पडळकर म्हणाले, तेव्हा जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या प्रश्नावरून सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तेव्हा दे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही असे सांगत तो आमचा निर्णय योग्य होता असेही मत व्यक्त केले. मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या …

Read More »

अजित पवार म्हणाले, जल्लोष करणारे आंदोलक कर्मचारी नंतर सिल्व्हर ओकवर का? बरंच काही ऐकायला आलंय पण त्याबाबत बोलणे योग्य नाही

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रश्न अंतिम निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी काही एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल करत चपला आणि दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शरद पवारांचे …

Read More »

हल्ल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, कोण आहेत शोधा आणि कडक कारवाई करा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची …

Read More »

शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावर फडणवीस म्हणाले… कोणत्याही नेत्यांच्या घरावर असा हल्ला चुकीचाच

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर चपला आणि दगडफेक करत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या साऱ्या प्रकारामुळे सिल्व्हर ओकच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलाच गोंधळ आणि तणाव निर्माण झाला. या घटनेसंदर्भात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली असताना भाजपा नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही …

Read More »

शरद पवारांच्या घरावरील हल्ला निषेधार्ह; ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे एस. टी. कामगारांना भडकावणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नाना पटोलेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे, या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून आंदोलकांना चिथवाणी देणारे कोण आहेत? त्याचा शोध घेऊन कडक कारवाई करा, अशी मागणी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, मुद्रांक शुल्क धोरण बनवा पण विकासकांवर कारवाईही करा गृहनिर्माण विभाग आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईत म्हाडाच्या ५६ इमारती असून या इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने करण्यासाठी जे विकासक पुढे येतात त्या विकासकांना मुद्रांकशुल्क एकरकमी भरावे लागते याऐवजी त्यांना ही रक्कम टप्प्या टप्प्याने अंतिम भोगवटा प्रमाणपत्र देण्याआधी त्यांच्याकडून भरून घेण्यास मान्यता देता येईल का याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश देत भोगवटा प्रमाणपत्र रहिवाशांना न देणाऱ्या विकासकांवर कारवाई …

Read More »