Editor

कोरोना: ३ लाखापार रूग्ण तर ८ लाख घरी गेले : मुंबई-ठाण्याची एकूण संख्या ४ लाखावर २४ हजार ६१९ नवे बाधित, १९ हजार ५२२ बरे तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या सातत्याने वाढतच असून आज पुन्हा २४ हजार ६१९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ११ लाख ४५ हजार ८४० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख १ हजार ७५२ वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासात १९ हजार ५२२ रूग्ण बरे …

Read More »

अंतिम वर्षाचे परिक्षा फॉर्म भरण्यास ३ दिवसांची मुदतवाढ; बॅकलॉग परिक्षा २५ तारखेपासून अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल-उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून बँकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा २५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज …

Read More »

मुंबईत पोलिसांकडून पुन्हा लॉकडाऊन ; कलम १४४ लागू पोलिस प्रशासनाकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने या संख्यावाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यावर बंदी घालत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच बाजार, मंदीर आदीसह कोणत्याही परिसरात एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिस उपायुक्त शहाजी उपम यांनी …

Read More »

कोविड-19 पार्श्वभूमीवर या ठिकाणी करणार १२०४ डॉक्टरांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत कोविड-19 रुग्णांची निकड लक्षात घेऊन संस्थानिहाय आणि विषयनिहाय बंधपत्रित उमेदवारांना सेवेसाठी नियुक्ती देण्यात येणार असून सध्या १ हजार २०४ बंधपत्रित उमेदवार यामुळे उपलब्ध होणार आहेत. काही विषयांमधील उमेदवार अधिक असून विषयनिहाय जागा कमी उपलब्ध आहेत अशा उमेदवारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ निवासी किंवा वैद्यकीय …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय : पोलिस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा बाजूला काढणार गृहमंत्री अनिल देशमुख ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी राज्यात पोलिसांच्या १२ हजार ५०० जागा भरण्यात येणार आहेत. मात्र या जागा भरताना मराठा समाजाला आरक्षणातर्गत येणाऱ्या १३ टक्के जागा वेगळ्या काढणार असून त्यातील कायदेशीर बाबी जागा भरून मराठा समाजातून त्या भरणार असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटरवरून दिली. आरक्षणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून …

Read More »

जेष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: प्रतिनिधी एकेकाळी हीट अँड हॉट नाटकातून भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई उर्फ आशू यांचे (वय ७५) किडनीच्या विकाराने  बुधवारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (१७ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात  आले. ललिता देसाई यांचा जन्म २१ …

Read More »

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्विटरवर ट्रेंड १.१४ मिलियन ट्विटच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारण, बेरोजगारी, सरकारी कंपन्यांच्या विक्रीवरून प्रश्नांची सरबती

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय नेत्यांच्या वाढदिवसाला वर्तमान पत्रे, टेलिव्हिजन यासह सोशल मिडियावर शुभेच्छांचा ट्रेंड आपल्याला नवा नाही. परंतु सलग दोनवेळा देशाच्या पंतप्रधान पदी विरोजमान झालेले नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असताना ट्विटरवर राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून ट्रेंड केला जात असून मोदीजी नोकऱ्या कुठे आहेत? जीडीपी रसातळाला गेलाय,  असा सवाल नेटकऱ्यांकडून …

Read More »

रेडिरेकनरची फाईल कुठल्या कुठल्या बंगल्यावर लक्ष्मीदर्शन करीत फिरतेय ? कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर असल्याचा भाजपा नेते अँड शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी बांधकाम प्रकल्पांना आकारण्यात येणारा प्रिमीयम कमी करण्याचा राज्य शासन विचार करीत असून यावरून राज्य सरकारवर टीका करताना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी राज्यात कोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, अशा सूचक शब्दात निशाणा साधला आहे. प्रिमीयम मधून महापालिकांना उत्पन्न मिळते मात्र राज्य शासनाने मुंबई, ठाणे, …

Read More »

आदीवासी भागात सेवा देणा-या वैद्यकीय अधिका-यांच्या मानधनात दुपटीने वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी भागात ‘नवसंजीवनी’  योजनेंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता, तसेच शून्य ते सहा वयोगटातील बालकांना पाड्यांवर जाऊन वैद्यकीय सेवा आणि उपचार देणाऱ्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानधन २४ हजारावरुन थेट ४० हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यां’च्या प्रश्नांसंदर्भात …

Read More »

कोरोना : रूग्ण ११ लाखापार तर दैंनदिन २० हजारापार २३ हजार ३६५ नवे बाधित, १७ हजार ५५९ बरे झाले तर ४७४ मृतकांची संख्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील आठभडारात १ लाख रूग्णसंख्येने वाढ झाली असून आजस्थितीला रूग्ण संख्या ११ लाख २१ हजार २२१ वर पोहोचली आहे. तर आज २३ हजार ३६५ इतके निदान झाले तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९७ हजार १२५ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात १७ हजार ५५९ इतके रूग्ण …

Read More »