मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी …
Read More »कोरोना : मृतकांच्या संख्येत घट होवूनही मृत्यू दर फरक नाही ५ हजार ४३९ नवे बाधित, ४ हजार ०८६ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील महिनाभरापासून सातत्याने मृतकांच्या संख्येत घट होत असल्याची आकडेवारी दिसून येत आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. तर सलग ३ ऱ्या दिवशी राज्यातील मृतकांची संख्या ३० इतकी आढळून येत असली तरी राज्याच्या मृत्यू दरात घट होत नाही. आजही राज्यातील मृत्यू दर २.६१ हून अधिक दिसत आहे. …
Read More »राज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा ७०० रूपये अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धान उपादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार जो हमीभाव देईल त्यापेक्षा जास्त भाव राज्य सरकारकडून देण्यात …
Read More »ईडी कारवाईवर पवार म्हणाले, विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर सरनाईक कुटुंबियांच्या विरोधात ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया
मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर थेट निशाणा साधत म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही …
Read More »शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर
मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …
Read More »९ हजार शाळांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६४३ कोरोना पॉझिटीव्ह
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल …
Read More »२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना द्यावी अशी मागणी …
Read More »खुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार प्रकल्पाचे पुढील काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.वर्षा या शासकीय निवासस्थानी २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी …
Read More »कोरोना : कालच्या तुलनेत बाधितांमध्ये हजाराने घट मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा जास्त ४ हजार १५३ नवे बाधित तर ३ हजार ७२९ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कालच्या तुलनेत १ हजाराने घट आलेली आहे. काल ही संख्या ५ हजार ७६० इतकी संख्या आढळून आली होती. त्यात हजाराने घट होत ४ हजार १५३ इतके बाधित आढळून आलेले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ८४ हजार ३६१ वर तर …
Read More »सा.बां.विभागाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांच्या टोलमध्ये वाढ हलक्या वाहनांवरील सूट कायमच-मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसेच कार, जीप, एसटी व स्कूल बसेस व हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही वाढ सुमारे १० टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya