मुंबई : प्रतिनिधी पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच …
Read More »सावधान ! Mont Blanc वेबसाईटवरून मेसेज आलाय? लॉकडाऊनच्या काळात ४०४ गुन्हे दाखल, २१३ जणांना अटक
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. सध्या Mont Blanc नावाच्या नकली वेबसाईट संदर्भात आर्थिक फसवणूकीच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत .त्यापासून सावध राहावे. असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. तसेच राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे …
Read More »पोलिसांबरोबर काम करू, एकतर गाडीची व्यवस्था करा नाहीतर घराजवळ नियुक्ती द्या संघटनेचे प्रशासनाला पत्र
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर मुंबईतून परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मुळ गावी जात आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पोलिस दलास मदत करण्यासाठी मंत्रालयातील १४५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे उपनगरात रहात असल्याने त्यांच्या येण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यासाठी एक तर …
Read More »मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे …
Read More »अन्नधान्याची गरज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी आता कृषी क्षेत्रावरच भिस्त राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मत
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »राज्यपालांना भेटणारे फडणवीस कदाचित मुख्यमंत्र्यांचा नंबर विसरलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रजयंत पाटील यांची भाजपाला उपरोधिक टोला
मुंबई: प्रतिनिधी फडणवीस म्हणतात आम्हाला विचारले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालांना भेटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी इतके वर्षे काम केलंय आता मात्र मुख्यमंत्र्यांचा नंबर ते विसरलेत का अशी असा उपरोधिक सवाल करत तुमच्या सुचना असतील तर मन मोठे करून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त व्हा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »रूग्ण संख्या पोहोचली ३९ हजारावर तर घरी गेले १० हजाराहून अधिक कोरोनाचे आज २२५० नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे …
Read More »केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ११ राष्ट्रीय संघटना उतरणार
मुंबई: प्रतिनिधी सद्यस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांनी कामगार विरोधी धोरणांमध्ये वाढ केली आहे. या विरोधात देशातील प्रमुख ११ राष्ट्रीय संघटनांनी शुक्रवार २२ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. राज्यातही मध्यवर्तीच्या संघटनेच्या समर्थ नेतृत्त्वाखाली हे लक्षवेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. आंदोलनातील …
Read More »अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत भाजपावाल्यांनो ‘काळे झेंडे’ आंदोलन हा कोरोना योद्धाचा अपमान- अजित पवार
मुंबई: प्रतिनिधी स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र …
Read More »कंटेन्मेंट क्षेत्र वगळता चित्रकरणास परवानगी : लोककला, तमाशा कलावंतांचा विचार करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्मात्यांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार …
Read More »
Marathi e-Batmya