Editor

मूळ गावी गेलेला तो परत येतोय, राज्यात…पण क्वारंटाईन होवून सर्व कामगारांची नोंद, थर्मल तपासणी : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद, थर्मल तपासणी करण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता …

Read More »

काँग्रेसच्या या मागणीत थोडा बदल करत भाजपाने केली तीच मागणी वीज बील किमान रकमेचे आकारण्याची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यापासून ते राष्ट्रीयस्तरापर्यंत काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाला आणि त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी विरोधी किंवा जनता विरोधी असल्याची बतावणी-टीका भाजपाकडून सातत्याने केली जाते. मात्र राज्यात पहिल्यांदाच टाळेबंदीमुळे आर्थिक नुकसानीत असलेल्या सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक-व्यावसायिकांची वीज बीले किमान रकमेनुसार आकारावीत अशी मागणी भाजपाने केली. तर २४ तासापूर्वी मुंबई काँग्रेसने अशीच मागणी करत …

Read More »

आजही गुंतवणूकदारांची पहिली पसंती रिअल इस्टेटच हाउसिंग डॉट कॉम आणि नरेडकोचा सर्वेक्षण

मुंबई/नवी दिल्ली : प्रतिनिधी हाऊसिंग डॉट कॉम आणि नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको) यांनी संयुक्तपणे जारी केलेल्या ‘कन्सर्न्ड येट पॉसिटीव्ह – द इंडियन रिअल इस्टेट कंस्यूमर (एप्रिल – मे २०२०) या अहवालानुसार रिअल इस्टेट ग्राहक येत्या सहा महिन्यांसाठी आर्थिक परिस्थिती आणि उत्पन्न स्थिरतेच्या बाबतीत सकारात्मक आहेत. रिअल इस्टेट (३५%) …

Read More »

मुबईसह राज्यात गणेशोत्सव साजरा होणार मात्र मिरवणूका नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी हे खरे आहे की नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. कोरोनाचा धोका संपलेला नाही. गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत साधेपणाची चौकट …

Read More »

चीनला ‘लाल डोळे’ दाखवा अन्यथा ‘चीनी खुळखुळे’ वाजवत बसा मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'चिनी खुळखुळे' भेट

मुंबई: प्रतिनिधी चीनने केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला. चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले …

Read More »

कोरोना: बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी प्रगती तर नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ ३३०७ नवे रूग्ण, ११४ जणांचा मृत्यू तर ५१ हजारावर अॅक्टीव्ह रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात राज्याच्या आरोग्य यंत्रणेला यश असल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला बाधीत रूग्णांची संख्याही दिवसागणिक कमी-जास्त होत असल्याने नवे रूग्णही संख्येने आढळून येत आहेत. मागील २४ तासात ३३०७ नव्या रूग्णांचे निदान तर ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज १३१५ जण बरे होवून …

Read More »

चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्यापेक्षा आणखी वाढीव मदत देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री बोलत होते. …

Read More »

न्यायालयाने सांगितलेल्या संस्था वगळता इतर सहकारी संस्थाच्या निवडणुका नाही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. या आदेशामधून फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केलेल्या संस्थांना वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग …

Read More »

कोरोना चाचणीसाठी लॅबमध्ये जाताय तर मग २५०० रूपयेच द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून नवी दर आकारणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. तसेच मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० …

Read More »

राज्यातील उपसरपंचांच्या खात्यावर थकीत मानधन जमा पहिल्यांदाच १५.७२ कोटी रुपये जमा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांबरोबर आता उपसरपंचांनाही दरमहा मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत फक्त सरपंचांना मानधन देण्यात येत होते, त्यात उपसरपंचांचा समावेश नव्हता. पण आता सरपंचांप्रमाणे उपसरपंचांनाही मानधन सुरु करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात १५.७२ कोटी रुपयांची रक्कम उपसरपंचांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »