शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ; तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. …
Read More »पॉलीटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करण्यास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना दिलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णय
विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आणखी एक महत्त्वपूर्ण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय घेतला असून प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अर्थात पॉलीटेक्निक अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ६ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत …
Read More »पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंदिरा नूयी म्हणाल्या, अमेरिके व्यतीरिक्त भारतासह इतर देशात सीईओ झाले नसते
पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नूयी यांनी एक वाद निर्माण केला. त्यांनी म्हटले आहे की, भारतासह अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात त्या जागतिक कंपनीच्या सीईओ ‘कधीही’ झाल्या नसत्या. आपल्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी अमेरिकेच्या ‘गुणवत्तेवर आधारित’ (मेरिटोक्रॅटिक) प्रणालीला दिले आहे. बुधवारी अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव कॉंडोलीझा राईस …
Read More »राम मंदिरात झालेल्या दान चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून पहिल्यांदा भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी केले भाष्य
अयोध्या येथील राम मंदिरात दानपेट्यांमधून झालेल्या चोरीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त करत पहिल्यांदा भाष्य केले. या घटनेला ‘अत्यंत वेदनादायक’ असे संबोधत, संघाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि मंदिर व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व असावे, अशी आशाही यावेळी व्यक्त केली. नवी दिल्लीतून जारी केलेल्या निवेदनात, संघाचे …
Read More »साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबईतील अंधेरीतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा झालेल्या दुःखद मृत्यूची घटनेने गुरुवारी विधानसभेत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या घटनेला गंभीर शासकीय निष्काळजीपणा बळी म्हटले असून, जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभा सभागृहात या विषयावरील चर्चेदरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रशासनाच्या …
Read More »दत्तात्रय भरणे याची माहिती, महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून सन्मान देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यातील महिलांसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, बायकोचे नाव ७ /१२ उताऱ्यावर घालण्याची तरतूद करा महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ वर बोलताना जयंत पाटील यांचे मत
आज विधानसभेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ऐतिहासिक ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ सादर केले. घरावर पत्नीचे नावही असले पाहिजे हा कायदा शरद पवार साहेबांनी आणला. त्याप्रमाणे बायकोचे नाव सातबारा उताऱ्यावर घालण्याची तरतूद करा, तर खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळेल असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, महापौर व पालिका आयुक्तांवरच ३०२ चा गुन्हा नोंदवा मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी, जबाबदारी निश्चित करून कारवाई करा
मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून …
Read More »मिनाक्षी नटराजन यांचा आरोप, वोटचोरी, सीटचोरी, पक्ष चोरीनंतर आता नागरिकता चोरीचे देशासमोर मोठे संकट मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करणे हा लोकशाहीवरच मोठा अन्याय, आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज: हर्षवर्धन सपकाळ
देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क …
Read More »डॉ पंकज भोयर यांचा इशारा, शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार अशा शाळांची यादीही तयार करण्याचे प्रशासनाला दिले आदेश
विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करील, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित …
Read More »
Marathi e-Batmya