राज्यात सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही यावर्षाअखेरीस दिवसा वीजपुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य सदाभाऊ …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !
२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये मनमोहन सिंग आणि शरद पवार यांनी तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं. त्यावेळी राज्यतील तब्ब्ल ४२ लाख ४८ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार नाशिक मधील टीसीएसमधील नीदा खान प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे. त्यामुळे विद्यमान कायदे व नियमांचे पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा व विधानपरिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची …
Read More »बाबासाहेब पाटील यांची माहिती, कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पूर्वीच्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनाही यंदाच्या योजनेत समाविष्ट करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत लवकरच निर्णय घेतला …
Read More »महाराष्ट्रातील सात मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान दुसऱ्या टप्प्यात ६५ मान्यवराना पद्म पुरस्काराने सन्मानित
देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. पद्म पुरस्कार वितरणाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण
सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो. या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये, यासाठी ‘ग्रीड सपोर्ट चार्ज’ आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ ०.१३ टक्के ग्राहकांवर लागू होते. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यातील …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेती व्यवसाय करताना मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना करणार असल्याचे कृषीमंत्री यांचे विधानसभेत उत्तर
शेतकरी सक्षमीकरण, कर्जमुक्ती, हवामान बदलाशी सामना, कृषी पायाभूत सुविधा, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसह विविध विषयांवर शासन व्यापक उपाययोजना राबवत असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत सांगितले. राज्य शासनाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३६ हजार ५८५ कोटींची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ ५६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, सलग सात दिवसाच्या आंदोलनानंतर आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे कर्मचारी हिताला प्राधान्य देत विविध मागण्या मान्य
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून, राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, परिवहन विभागातील कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी १६ जून २०२६ पासून बेमुदत …
Read More »मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. ‘नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार आमदार विजय देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली घोषणा
राज्यातील नागरिकांना खऱ्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही क्यूआर कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची माहिती तात्काळ मिळू शकते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. सोलापूर जिल्ह्यातील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून एकत्रित कार्यपद्धती कार्यरत
राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ व्यापार व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अमली पदार्थ विक्री व सेवनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू …
Read More »
Marathi e-Batmya