Editor

आदिवासींना घरे देण्यावरून राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री संघर्षाच्या पावित्र्यात राज्यमंत्री वायकर ४८० चौ.फुटाचे घर देणार तर मुख्यमंत्री म्हणतात ३०० चौ.फुटाचे घर देवू

मुंबईः प्रतिनिधी आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. मात्र इतक्या मोठ्या आकाराची घरे आदिवासीना देता येणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना ३०० चौरस फुटाची …

Read More »

२५ हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कृषी पंपाचे वाटप करणार १ लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत १ लाख शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे. साधारणतः ३ वर्षात ही योजना राबविण्यात येणार असून १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण केले जाणार आहे. या योजनेसाठी शासन ३ वर्षात ८५८.७५ …

Read More »

भाजप कार्यालयापासून राष्ट्रवादीच्या एल्गार आंदोलनास सुरुवात पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अटक

मुंबईः प्रतिनिधी वाह रे मोदी तेरा खेल…घरपोच दारु महेंगा तेल…मोदी सरकार हाय हाय… सरकार हमसे डरती है…पुलिस को आगे करती है… महागाई रद्द झालीच पाहिजे…लोडशेडिंग रद्द झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी आणलेले ‘गाजर’ चक्क …

Read More »

सरकारच्या आशिर्वादानेच कट्टरतावादी बेफाम काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी राज्यभरामध्ये अतिरेकी कारवाया करणा-या सनातन संस्थेशी संबंधित अनेक जणांना रंगेहात पकडले असतानाही सनातन संस्था आणि त्यांच्या प्रमुखांवर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून २००८ साली झालेल्या बॉम्ब स्फोटात सनातनच्या साधकांचा हात होता हे पुढे आणले आहे. असे असतानाही राज्य सरकार …

Read More »

परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी टीएचई (Times Higher Education) किंवा क्युएस (Quacquarelli Symonds) रँकीग २०० च्या आतील विविध देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील अशा २० विद्यार्थ्यांना …

Read More »

दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली. काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत …

Read More »

भक्तिमय शक्तिमय सावरगाव !! ना.पंकजाताई मुंडे यांच्या शब्दात भगवान बाबांचे महात्मे

गेले अनेक वर्षे झुंज देणे , प्राणपणाने सामना करणे हे माझ्या सवयीचे झाले आहे ! ‘संघर्ष’ शब्द टाळला कारण तो आता कोणिही वापरतं !! पण हजारो लाखो लोक काय म्हणतात हे ऐकण्याची पद्धत काय ,त्याची मानकं काय ???लोकांची भाषा समजावून सांगणारा ट्रान्सलेटर कोण ?? …लोकांचे कान, लोकंच शब्द, लोकांच परिणाम …

Read More »

मंत्रालयात सरकारी कर्मचाऱ्याने केला आत्महत्त्येचा प्रयत्न पोलिसांनी संबधित इसमास रूग्णालयात केले दाखल

मुंबईः प्रतिनिधी विविध स्वरूपांच्या आरोपात तथ्य आढळल्याने सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आलेल्या दिलीप सोनवणे नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. स्टेशनरी, पंखे आदी सरकारी साहित्य विकणे, वारंवार गैरहजर राहणे अशा …

Read More »

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत विदयार्थ्यांवर अन्याय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदभरतीत ८३३ विदयार्थ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या भविष्याचा विचार करुन राज्यसरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह ( परिवहन) विभागातंर्गत २३ डिसेंबर २०१६ ला …

Read More »

पुणे आणि नाशिकच्या रेल्वे प्रवासात मिळणार वाचायला पुस्तके डेक्कन क्वीन, पंचवटी एक्सप्रेसमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा मंत्री तावडेंचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत …

Read More »