Editor

प्लास्टिक बंदीनंतर रासायनिक खतांवर बंदी आणण्याचा विचार स्थानिक स्वराज्य संस्थांना पारितोषिके देण्याची पर्यावरण मंत्री कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जागतिक पर्यावरण दिन सोहळ्यातील पर्यावरण विषयक पारितोषिक वितरण कार्यक्रमात श्री. कदम बोलत होते. यावेळी राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, अपर मुख्य सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण …

Read More »

राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा सल्ला

नवी मुंबई : प्रतिनिधी आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला. कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, …

Read More »

शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता १५ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान …

Read More »

वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती लवकरच पदभार स्विकारणार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची आज राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी राज्य सरकारने नियुक्ती केली. मागील काही महिन्यांपासून वीज नियामक आयोगावरील दोन सदस्य निवृत्त झाल्याने आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. मात्र आता खुल्लर यांच्या नियुक्तीमुळे आयोगाचे कामकाज सुरु होण्यास मदत होणार …

Read More »

मंत्रालयासमोर न्याय मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या अंधानाही पोलिसी खाक्या सरकार दाद देईना आणि पोलिस आंदोलन करू देईना अशी अंधाची अवस्था

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे मंत्रालयात येवून किंवा मंत्रालयाच्या समोर निदर्शने  आपल्या न्याय मागण्यांच्या प्रश्नी दाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता अंध व्यक्तींनीही न्याय मागण्याच्या प्रश्नी दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर …

Read More »

नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेवरून शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्र्यांना इशारा संघर्ष टाळण्यासाठी नाणारची अधिसूचना रद्द करण्यासाठी शिवसेनेचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देवून दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा पत्र देत स्टारलाईटच्या तुतीकोरीन प्रकल्पासाठी ज्या पध्दतीने संघर्ष झाला पध्दतीने पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता असल्याने तो …

Read More »

शेतकरी आंदोलनाच्या आडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशांतता निर्माण परवतेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र राज्यात अशांतता पसरवी यासाठी शेतकरी नेत्यांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आंदोलनाला खतपाणी घालत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात जी शेतकऱ्यांची अवस्था आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाची काँग्रेसची तक्रार भाजप उमेदवाराने मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याने आयोगाने स्वतः लक्ष घालण्याची मागणी

दिल्ली : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला गेला. एकंदरीत निवडणूक यंत्रणा कुचकामी तर ठरलीच, संपूर्ण यंत्रणाच सरकारच्या दबावाखाली काम करते आहे असे चित्र दिसून आले. राज्यातील लोकशाही चुकीच्या हातात असून यापुढील निवडणुका निष्पक्षपातीपणे होतील का? अशी शंका जनतेच्या मनात निर्माण …

Read More »

पत्ता कट होवूनही मुख्यमंत्र्यांची सूचना आणि आरोग्य मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी डॉ.दिपक सावंत यांचे भवितव्य ठरणार जुलै महिन्यात

मुंबई : प्रतिनिधी जुलै महिन्यात रिक्त होत असलेल्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेने आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांना उमेदवारी न देता प्रभाग क्र.४ चे पदाधिकारी विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. यापार्श्वभूमीवर आज मंगळवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला …

Read More »

शिवसेनेशिवाय विजय शक्य नसल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या भाजपच्याच पदाधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांची कबुली

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत सत्तेतील सहकारी पक्ष शिवसेनेने चांगलीच कुरघोडी केली. तसेच आहे त्या जागा राखण्यातही यश आले नसल्याने आगामी निवडणूकीत शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय भाजपला यश मिळणे शक्य नसल्याची चिंता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश …

Read More »