Editor

शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी जनतेकडून सरकार वसूल करणार पैसे सौर ऊर्जा कृषी पंपासाठी लागणाऱ्या निधी उपलब्धतेसाठी ऊर्जा विभागाचा विचार

मुंबईः प्रतिनिधी राज्यातल्या आर्थिक परिस्थिती कितीही चांगली असल्याचा दावा राज्य सरकार करत असली तरी तिजोरी रिकामीच असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासाठी लागणारा निधी राज्यातील वीज ग्राहकांच्या खिशातून प्रत्येकी वसूल करण्याचा विचार ऊर्जा विभागाकडून करण्यात येत असून कृषी पंपासाठी लागणारा १७०० कोटी रूपयांपैकी …

Read More »

विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावा राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांची सूचना

पुणेः प्रतिनिधी पुणे विभागातील विविध प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना केवळ कागदोपत्री अथवा एकतर्फी जमिनीचे वाटप न होता त्यांचे योग्य पध्दतीने शाश्वत पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी बाधित गावात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि यंत्रणा प्रकल्प अधिकारी यांनी विशेष कॅम्प लावून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा कवठा गाव गहाण ठेवणार उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावातील गावकऱ्यांचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्याना आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावच्या गावकऱ्यांनी आपले गावच गहाण ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती सेवाग्राम स्कूल ऑफ नेचर अँण्ड कल्चरचे विनायकराव पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी …

Read More »

सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सरकारला इशारा

औरंगाबाद : प्रतिनिधी या सरकारचा संविधानाला विरोध आहे…धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध आहे… धर्मनिरपेक्ष शब्द टोचतो का ? ७० वर्ष हा वाद झाला नाही मग आत्ताच का ? जी मनुस्मृती सर्व जातीतील लोकांना नीच मानते,भेदभाव करते अशा मनुस्मृतीला जपण्याचे काम भाजप करत आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे …

Read More »

जनताच माझा पक्ष निवडणूक लढवण्यावर उदयनराजे ठाम

मुंबईः प्रतिनिधी जनताच माझा पक्ष आहे. जोपर्यंत जनतेला मी निवडणूक लढवावी, असे वाटते तोपर्यंत मी निवडणूक लढवणार, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी आपल्याला पक्षाने उमेदवारी देवो अथवा ना देवो, आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, असल्याचे सूचित केले. मंगळवारी खासदार उदयनराजे मंत्रालयात आले होते. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मंत्रालयात उदयनराजेंच्या भाजप मंत्र्यांशी गाठी-भेटी मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, महाजन यांच्याशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी मंत्री परिषदेच्या दिवशी मुंबईत मंत्रालयात येऊन भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या. उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उदयनराजे लोकसभेची जागा भाजपच्या तिकीटावर लढविणार आहेत. ते भाजपमध्ये दाखल होणार आहेत, अशा देखील …

Read More »

दुष्काळग्रस्त भागाची जबाबदारी आता पालक मंत्र्यांच्या शिरावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळावर चर्चा

मुंबईः प्रतिनिधी मुंबई राज्यावर विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आले आहे. यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारला यावर उपाययोजना करताना नाकेनऊ येणार आहे. राज्यातील २०१ तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागांतील पिकेही धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर या तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा मंत्री तसेच …

Read More »

भूजल अधिसूचना राज्यातील शेतकऱ्यांना संकटात नेणारी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कडाडून विरोध

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच जाहीर केलेल्या महाराष्ट्र भूजल अधिसूचनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या नियमावलीची तातडीने अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. तसेच, या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या तोकड्या व अकार्यक्षम यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल, …

Read More »

लैंगिक छळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कायद्याची माहिती आवश्यक कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ कायद्याची थोडक्यात माहिती

मागील काही वर्षांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा लैंगिक छळ करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यामध्ये कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील महिलांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे.कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांमध्येही वाढत होत आहे. एका संशोधन अहवालानुसार कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या लैंगिक छळाचे प्रमाण चाळीस …

Read More »

खेळाच्या मैदानावरील दांडीया संकटात क्रिडा विभागाला भूमिका मांडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरात मुलांसाठी खेळाची मैदाने मोठ्या मुश्किलीने उपलब्ध होत असताना नवरात्रोत्सवाचे निमित्त पुढे करत राज्य सरकारने ही मैदाने दांडियासाठी उपलब्ध करून देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे मुलांवर खेळापासून वंचित राहण्याची पाळी आहे. या धोरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार विनायक सानप यांनी जनहित याचिका दाखल केली असून क्रिडा विभागाला …

Read More »