Editor

पालघरमध्ये भाजपने जागा राखली मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिष्ठा राखली

मुंबई : प्रतिनिधी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणूकीत लोकसभेतील संख्याबळात घट झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची असलेली पालघरची जागा भाजपला राखण्यात यश आले. भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना …

Read More »

निर्माते डॉ. लालासाहेब शिंदे यांची सामाजिक बांधिलकी वयाच्या ६७ व्या वर्षी कोलंबो विद्यापीठाची डॉक्टरेट इन लिटरेचर पदवी मिळवली

मुंबई : प्रतिनिधी सुप्रीम मोशन पिक्चर्सअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार सिनेमांची निर्मिती आणि प्रस्तुती करणारे तसेच एल.व्ही.शिंदे ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष लालासाहेब शिंदे यांना ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन अँड मेडिसिन ऑफ कोलंबो (श्रीलंका ) तर्फे डॉक्टरेट इन लिटरेचर या पदवीने नुकतंच सन्मानित करण्यात आले. वयाच्या ६७ व्या वर्षी शिकण्याची उमेद …

Read More »

खेळाच्या रूपात रुपेरी पडद्यावर चमकणार लाल मातीतील गोटया बालपणीच्या खेळावर आधारीत एक आगळा-वेगळा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी बालपणीच्या गोटया खेळण्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या असतील. मोबाईल विश्वात हरवलेल्या आजच्या छोटया पिढीला गोटया आणि त्यांचा खेळ कसा असतो हे कदाचित ठाऊक नसलं तरी गोटयांचा खेळ त्यांना खऱ्या अर्थाने लवकरच समजणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोटयांकडे व्यावहारिक जगात केवळ ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं जात असलं …

Read More »

सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटने करत भावनाशून्यतेचे प्रदर्शन तंबाखू विरोधी प्रदर्शनाला भेट देत इलेक्ट्रीक वाहनांचे उद्गाटन केले

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाला काही तासांचा अवधी लोटत नाहीत तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यात दुखवटा जाहीर करण्याऐवजी मंत्रालयाच्या दालनात उद्घाटने आणि प्रदर्शनांना भेटी देत आपल्या भावना शुन्यतेचे जाहीर प्रदर्शन केले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या …

Read More »

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३५ वाजता सोमय्या रूग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर त्यांच्या खांमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. …

Read More »

राष्ट्रवादीच्या मोहीते-पाटील साम्राज्याला मोठा धक्का सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे सोलापूर जिल्हा बँकेवर सत्ता असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे संचालक मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील गटाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसला असून या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सहकार विभागातील विश्वसनीय …

Read More »

मातोश्री रमाबाई यांचे जीवन भारतीय महिलांना प्रेरणादायी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिप्रादन : पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे : प्रतिनिधी मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाकडून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केले. पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात राज्यातील पहिल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या  हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसचा कार्यकर्ता पराभव करेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक बुथवरील भाजपच्या पगारी कार्यकर्त्यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज टिळक भवन, दादर येथे बुथ कमिट्यांच्या विधानसभा समन्वयकांची बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघाचे बुथ कमिटी …

Read More »

मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इफ्तार पार्टी पार्टीला उद्योगपती, सिनेतारका, राजकारणी उपस्थित राहणार

मुंबई : प्रतिनिधी आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने पुढाकार घेतला असून मुस्लिम समाजबांधवाचा पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंच या संघटनेच्यावतीने मुंबईत पहिल्यांदाच रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. ही इफ्तार पार्टी ४ जून रोजी …

Read More »

पीक विम्याची रक्कम ७ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा मुख्यमंत्र्यांचे विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ७ जून पूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. प्रधानमंत्री पिक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण …

Read More »