साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल हिंसक जमावाने घरे पेटवली

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समूहावर महापुरुषांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री ९.३० च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. २ ते ३ हजार युवकांचा जमान आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.

या जमावाने त्याच परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने चाल केली. यावेळी त्या प्रार्थनास्थळामध्ये सात ते आठ जण प्रार्थनेसाठी जमले होते. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली.

About Marathi E Batmya

Check Also

भगवान मुरुगन यात्रेत अरोगाडा घोषणा मुख्यमंत्री विजय यांच्यासाठी, भाजपा आणि डिमके घोषणा वापरावर टीका उत्सवाचा वापर राजकारणासाठी केल्यावरून भाजपा आणि डिमकेने केली टीका

अरोगाडा ही घोषणा भगवान मुरुगन यांच्याशी संबंधित आहे. रविवारी तिरुचेंदूर येथील समुद्रकिनारी असलेल्या मंदिरात, पार्श्वगायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *