साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल हिंसक जमावाने घरे पेटवली

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समूहावर महापुरुषांच्या अनुषंगाने आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री ९.३० च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. २ ते ३ हजार युवकांचा जमान आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.

या जमावाने त्याच परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या दिशेने चाल केली. यावेळी त्या प्रार्थनास्थळामध्ये सात ते आठ जण प्रार्थनेसाठी जमले होते. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली.

About Marathi E Batmya

Check Also

अँथ्रोपिक सीईओच्या पत्नी कॅमी क्लर्कची एपस्टाईनकडे पॉर्न चित्रपटात गुतंवणुकीची मागणी ई-मेलमधून माहिती उघडकीस

द वॉल स्ट्रीट जर्नल आणि एपस्टाईन फाईल्समधील ईमेल्सनुसार, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांची पत्नी, कॅमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *