संकल्प प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेमार्फत नुकतीच ७ सदस्यांनी राज्याला भेट दिली. राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून त्यांना विविध योजनांची माहिती दिली. …
Read More »राज्यपालांच्या हस्ते मला पुरस्कार नको त्यापेक्षा…. शरद पवार यांचे पुतणे तथा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांची घोषणा
शेतकऱ्यांची काळजी करणारा रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हे पुस्तक लिहिणाऱ्या ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने आपल्याला राज्यपालांच्या हातून पुरस्कार घेण्याऐवजी मी कार्यालयात जाऊन तो स्वीकारेल असे शरद पवार यांचे पुतणे तथा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र …
Read More »राज ठाकरेंच्या टिळक वक्तव्यावरून मंत्री आव्हाड म्हणाले, … सांगायला लाज वाटती का? चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही - जितेंद्र आव्हाड
औरंगाबाद येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक विधान करत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांनी केलेल्या दाव्यातील हवा काढून घेतली. धडधडीत सांगता लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी …
Read More »राणा दाम्पत्याला तुर्तास दिलासा नाही, बुधवार पर्यंत तुरुंगातच वेळ संपत आल्याने न्यायालयाने सांगितले बुधवारी निर्णय देणार
मागील १० दिवसांपासून हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे तुरुंगात आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आजही न्यायालयालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी बुधवारी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळू शकला नाही. गेल्या …
Read More »केंद्राने सांगितले, कोळसा हवाय तर परदेशातून मागवा २२ लाख मेट्रीक टन कोळसा आयात करण्यास दिली परवानगी
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपू्र्ण देशभरात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र देशात स्वत:च्या मालकीच्या कोळसा खाणी असताना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दात कोळसा हवाय तर परदेशातून मागवा असा सल्लाच महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यांना दिला असल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. यासंदर्भातील केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाविकास आघाडी सरकारला पाठविलेले पत्र मराठी …
Read More »राज ठाकरेंचे ट्विटरवरून आदेश, आरत्या करू नका पुढील आदेश उद्या देणार
पुणे येथील पत्रकार परिषदेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये महाआरती करणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्याच दिवशी रमजान ईद येत असल्याने या सणाला गालबोट लागू नये म्हणून अक्षय तृतीयेला सर्व मंदिरामध्ये होणाऱ्या आरत्या करू नका असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून …
Read More »भोंग्यावरून महाराष्ट्रात चालवलेला तमाशा बंद करा मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंचा वापर-नाना पटोले
भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच, पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका आहे. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला …
Read More »राष्ट्रवादी म्हणते, राज ठाकरेंची उंची शरद पवारांच्या नखाऐवढी… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला
औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे कोणाला लक्ष्य करणार काय बोलणार याबाबतची उस्तुकता राजकिय वर्तुळात निर्माण झाली होती. मात्र राज ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर एका चकार शब्दाने न बोलता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जाती-पातींमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु केल्याचा आरोप …
Read More »राज ठाकरेंच्या भाषणावर जलील म्हणाले, “सियासत की दुकानों मे रोशनी के लिए…” सभेनंतर एमआयएमचे खासदार जलील यांची टीका
मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादेतील सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठविल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा भोंग्यावरून अल्टीमेटम दिला. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणावरून खोचक टीका केली. ते म्हणाले की, सियासत की दुकानों मे …
Read More »राज ठाकरेंचा इशारा, हा विषय धर्माचा नाही, पण… राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड पण शिवसेना, मुख्यमंत्र्यांवर एक शब्दही नाही
मी दोन सभा घेतल्या त्यानंतरही ते सगळे इतकं बोलतं आहेत की, थांबायचे नावच घेत नाहीत. मी म्हणालो शरद पवार नास्तिक आहेत. तर त्यांच्याकडून आणि सुप्रिया सुळेंकडून त्यांच्या देवदर्शनाचे, पूजा अर्चाचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर देवळात जाऊन पूजा करत असल्याचेही फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. केवळ मी …
Read More »
Marathi e-Batmya