Breaking News

नाबार्ड देणार चालू वित्तीय वर्षासाठी ६ लाख १३ हजार कोटींचे कर्ज महाराष्ट्रासाठी नाबार्डने फोकस पेपर तीन ते पाच वर्षांसाठी तयार करावा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात ही कामे पूर्णत्वाला जाऊ शकतील अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे नाबार्डचा २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठीचा …

Read More »

स्व.गणपत आबा देशमुखांनंतर आता शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा सांगोल्याचा विकास करण्यासाठी इथे राष्ट्रवादी अधिक प्रभावी करा; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देण्याचे काम अनेक वर्षे या सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीने केले. त्यांनी तपस्वी म्हणून काम केले. मात्र त्यांच्यानंतर आता या मतदारसंघात अधिक प्रभावी काम करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे येथील …

Read More »

न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, कोरोनात नाव कमावले मग आता का बदनाम करताय? लसीकरण झालेल्यांनाच लोकलने प्रवासास परवानगी वरून फटकारले

रोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा भाग म्हणून ज्यांनी दोन लसीचे डोस घेतले अशांनाच लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला. विशेष म्हणजे राज्यात दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाटही आता ओसरली असताना अद्यापही या नियमानुसारच नागरीकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे म्हणाले, …तर चौथ्या लाटेचा धोका नाही मार्च एप्रिलमध्ये निर्बंधमुक्त होण्याची शक्यता

जवळपास महिनाभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मार्च नाही तर एप्रिल महिन्यात राज्यात निर्बंधमुक्त होण्याची शक्यता असून राज्यातील कोरोनाच्या चवथ्या लाटेचा सामना करायचा असेल तर सर्वांचेच लसीकरण व्हायला हवे. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. …

Read More »

फडणवीस म्हणाले, भाजपाचा भगवा छत्रपतींचा भगवा झेंडा सुरक्षित ठेवणार शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

काही लोक केवळ भगवा मिरवतात पण पाठीमागे कोणकोणासोबत जाताय हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी आता केवळ आणि केवळ भाजपावर आलेली असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  अप्रत्यक्ष शिवसेनेला टोला लगावला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्या बोलताना शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा …

Read More »

भाजपा नेत्यांना नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रापेक्षा मोठे वाटतात महाराष्ट्राची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार-अतुल लोंढे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण करताना महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. या अपमानाबद्दल मोदींनी माफी मागावी यासाठी काँग्रेसचे आंदोलन असून काँग्रेसचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा नरेंद्र मोदी मोठे वाटत आहेत, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल …

Read More »

संतापलेले सोमय्या म्हणाले, शिव्या दिल्या तरी राऊतांबद्दल द्वेष नाही, ते खरे चाणक्य मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बायकोची बाजू घेणार नाही का?

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. कारण ते शब्द संजय …

Read More »

हिजाब वादावर वंचितचे अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यघटनेत याविषयी… कर्नाटक उच्च न्यायालयाला केली ही विनंती

मराठी ई-बातम्या टीम   कर्नाटकात सुरू झालेले हिसाब वादाचे लोन सध्या देशभर पसरले आहे. कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान देत मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून त्यावर न्यायालयातही सुणावनी सुरू आहे.कर्नाटक सरकारने आदेश दिले आहेत की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांनी ठरवून दिलेला गणवेश परिधान करावा. यावरूनच हा वाद पेटला आहे. कर्नाटकातील …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र केले हे आवाहन २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला

मराठी ई-बातम्या टीम २७ फेब्रुवारी हा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस असून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्रान्वये राज्यातील मनसैनिकांना केले आहे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. …

Read More »

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि उध्दव ठाकरे यांच्यात “या” विषयावरही झाली चर्चा आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा

मराठी ई-बातम्या टीम तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या समवेत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराज्यीय संयुक्त …

Read More »